Quantino Twentyfive: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती कारची. अत्याधुनिक सुविधांसोबत सध्या अनेक नवनवीन कार बाजारपेठेत येत आहेत. त्यामध्ये सध्या इलेक्ट्रिक कारची (Electric Cars) खूप मोठी क्रेझ आहे. प्रत्येकांनाच आपल्या कारमध्ये फार चांगले फिचर्स (Features) असावेत असे वाटते. आता एका कंपनीने अशी इलेक्ट्रिक कार बनवली आहे, ज्यामध्ये बॅटरी नाही, म्हणजे ही कार बॅटरीशिवाय धावणार आहे. त्यातल्या त्यात बॅटरीशिवाय धावता ही कार सर्वाधिक रेंजही देणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणती आहे ही कार…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्वांटिनो इलेक्ट्रिक व्हेईकल (Quantino Electric Vehicle) अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. ही कार कंपनी बॅटरी नसल्याच्या कारणामुळेही चर्चेत आली आहे. या इलेक्ट्रिक कारला ‘क्वांटिनो ट्वेंटीफाइव्ह’ (Quantino Twentyfive) असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये लिथियम आयन बॅटरीऐवजी समुद्राच्या पाण्याचे किंवा औद्योगिक पाण्याच्या कचऱ्याचे नॅनो-स्ट्रक्चर्ड बाय-आयओन रेणू वापरण्यात येणार आहेत. 

(हे ही वाचा : जपानच्या राजदूताला जबरदस्त मायलेज देणारी अन् अ‍ॅडव्हांस्ड फीचर्ससह सुसज्ज असलेली ‘ही’ कार भेट )

बॅटरीशिवाय कार कशी धावणार?

या क्वांटिनो ट्वेंटीफाइव्ह इलेक्ट्रिक कारमध्ये लिथियम आयन बॅटरीऐवजी समुद्राच्या पाण्यातील नॅनो-स्ट्रक्चर्ड बाय-आयओन रेणू किंवा औद्योगिक पाण्याचा कचरा इंधन म्हणून वापरला जातो. सोप्या भाषेत सांगायचे तर, समुद्राचे पाणी किंवा औद्योगिक पाण्याचा कचरा इंधन म्हणून वापरून तुम्ही ही इलेक्ट्रिक कार चालवू शकता.

2000KM पर्यंत रेंज

हे पाणी जैवइंधनाप्रमाणे कार्य करते आणि जैवइंधन बिनविषारी, ज्वलनशील आणि गैर-घातक आहे, म्हणजेच ते पर्यावरणाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवत नाही. यातून वीज तयार होते, जी कारच्या मोटरला उर्जा देते. कारच्या चारही चाकांवर इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आला आहे. एकदा टाकी भरली की कार २००० किलोमीटरची रेंज देऊ शकते. त्याचा कार्बन फूटप्रिंट नगण्य आहे, म्हणजे त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही.

(हे ही वाचा : प्रतीक्षा संपली! देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची डिलीव्हरी सुरु, एका चार्जमध्ये धावेल 315 KM )

सुमारे ५ लाख किमी चाचणी 

कंपनीने Quantino Twentyfive या इलेक्ट्रिक कारची सुमारे ५ लाख किमी चाचणी घेतली असून ही कार अतिशय वेगवान आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही कार केवळ ३ सेकंदांपेक्षा कमी वेळेत ० ते १०० किमीचा वेग गाठण्यास सक्षम आहे. इलेक्ट्रिक कार असल्याने ती आवाजही करत नाही, ज्यामुळे ध्वनी प्रदूषणालाही आळा बसेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Quantino twenty five electric car which does not have a battery and without battery the car can give a range of 2000km pdb