Raghav Chadha Car Collection: आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत आपचे खासदार राघव चढ्ढा निलंबित असणार आहेत. पण आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. पण तुम्हाला माहितेय का राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेले राघव चढ्ढा यांच्या ताफ्यात कोणती कार आहे. चला तर जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राघव चढ्ढा यांच्या ताफ्यात मारुतीची कार

राघव चढ्ढा यांच्याकडे यांच्याकडे मोठा कार संग्रह नाही. त्यांच्या ताफ्यात २००९ चा माॅडेल असलेली मारुती स्विफ्ट डिझायर कार असल्याची माहिती आहे. देशात सर्वात जास्त विकणाऱ्या कार्समध्ये या कारचा समावेश असतो. Maruti Suzuki Swift Dzire ही कार कंपनीने नुकतीच अपडेट केली आहे. ही कार ७.० इंचांच्या टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह येते, जी ट्रॅक चेंज, व्हॉल्यूम अप / डाऊन, रेडियो आणि मीडिया सेटअपसारख्या बेसिक फीचर्ससह येते. यामध्ये अॅपल कार प्ले आणि अँड्रॉयड ऑटो सपोर्ट देण्यात आला आहे.

(हे ही वाचा : देशातील रस्ते www.loksatta.com/auto/indian-politician-and-the-current-minister-for-road-transport-and-highways-nitin-gadkari-car-collection-pdb-95-3828959/बनवणारे नागपूरकर नितीन गडकरी स्वतः कोणती कार वापरतात माहित्येय? पाहून व्हाल थक्क )

या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये १.२-लीटर नॅचुरली एस्पिरेटेड के-सिरीज पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे ८९bhp पॉवर आणि ११३Nm पीक टार्क जेनरेट करतं. या इंजिनासह ५ स्पीड मॅनुअल गियरबॉक्स आणि ५ स्पीड AMT गियरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. हे मॉडेल २३.२६ kmpl मायलेज देतं.