Rare 1908 Harley-Davidson Bike: अलीकडेच, हार्ले डेव्हिडसनच्या (Harley-Davidson) एका व्हिंटेज बाईकचा लिलाव झाला आहे. ही बाईक १९०८ मध्ये हार्ले डेव्हिडसनने बनवली होती, ही बाईक खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी पहावयास मिळाली. ही ११५ वर्ष जुनी Harley-Davidson बाईक होती जी आता लिलावात विकली गेलेली जगभरातील सर्वात महागडी बाईक ठरली आहे. १९०८ च्या Harley-Davidson मोटारसायकलचा $९३५,००० (अंदाजे ७.७३ कोटी) मध्ये लिलाव झाला.
हार्ले डेव्हिडसनच्या बाईक या जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्या दमदार इंजिन आणि कडक लूकसाठी ही बाईक जगभरात ओळखली जाते. या बाईकची लोकांमध्ये इतकी क्रेझ होती की फेसबुकवर या ‘स्ट्रॅप टँक’ मोटरसायकलचा फोटो पोस्ट केल्यानंतर लगेचच त्याला ८,००० पेक्षा जास्त लाईक्स आणि ८०० च्या जवळपास कमेंट्स मिळाल्या.
लास वेगासमध्ये झाला लिलाव
२८ जानेवारी रोजी लास वेगासमधील मॅकम ऑक्शन्सने लिलाव आयोजित केला होता. मॅकमच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की. हा Harley-Davidson स्ट्रॅप टँक अत्यंत दुर्मिळ जातीच्या सर्वात जुन्या मॉडेलपैकी एक आहे. हे १९०८ मध्ये बनवलेल्या ४५० मॉडेलपैकी एक आहे.
(हे ही वाचा : तरुणाईला वेड लावणारी Royal Enfield ची ‘ही’ दमदार बाईक ३० हजारात खरेदी करा, ‘इतका’ भरा EMI )
1908 Harley Davidson कशी आहे खास?
मॅकम ऑक्शन्सच्या मोटारसायकल विभागाचे व्यवस्थापक ग्रेग अरनॉल्ड यांनी सांगितले की, ही बाईक १९४१ मध्ये डेव्हिड उहलिन यांना विस्कॉन्सिनच्या कोठारात सापडली होती, त्यांनी ती ६६ वर्षे त्यांच्याकडे ठेवली. ते नंतर पुनर्संचयित केले गेले, ज्यात त्याची टाकी, चाके, सीट कव्हर आणि इंजिन बेल्ट पुली यांचा समावेश होता.
त्याच वेळी, मॉडेलला स्ट्रॅप टाकी असे नाव देण्यात आले कारण त्याचे तेल आणि इंधन टाक्या फ्रेमला निकेल-प्लेटेड स्टीलच्या पट्ट्यांसह जोडलेले होते.
जगात फक्त १२ मॉडेल अस्तित्वात आहेत
१९०८ मध्ये Harley-Davidson ने फक्त ४५० युनिट्सचे उत्पादन केले होते आणि आता जगात मोटरसायकलचे फक्त १२ मॉडेल्स उपलब्ध मानले जातात. १९०७ मधील पट्टा टाकी $७१५,००० ला लिलावात विकली गेली.
त्याच वेळी, हार्ले डेविडसनच्या X350 आणि X500 बाईक्स भारतात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचे फीचर्स लीक झाले होते, ज्यामुळे असे अनुमान लावले जात आहे की हे दोन्ही मॉडेल स्पोर्टी पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात.