Ratan Tata Car Collection In Marathi : टाटा समूहाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष रतन टाटा यांचे काल ९ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. रतन टाटा हे अतिशय दानशूर व्यक्ती होते. आपल्या समाजकार्यासाठी ओळखले जाणारे रतन टाटा हे नेहमीच शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित कार्यासाठी निधी देत होते. करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अगदी डॉक्टरांसाठी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यापासून ते अन्नाची पाकिटे पुरवण्यापर्यंत अनेक माध्यमांमधून टाटा ग्रुप करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये उतरले होते. रतन टाटांच्या अनेक आवडी निवडी होत्या; त्यापैकी एक म्हणजे ‘गाड्यांचे प्रचंड वेड’ (Ratan Tata Car Collection) होते. ते क्वचितच महागड्या गाड्यांमध्ये फिरताना दिसायचे, तर रतन टाटा यांच्या मालकीच्या पाच खास कारबद्दल जाणून घेऊयात.

टाटा नॅनो (Tata Nano) :

रतन टाटा यांचा सुप्रसिद्ध उपक्रम म्हणजे एक स्वस्त कार तयार करणे, ज्यामुळे टाटा नॅनो देशात दाखल झाली. या कारला त्यांची “ब्रेन चाइल्ड” मानले जाते. टाटा नॅनोमध्ये 624 cc 2-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह, 37 bhp आणि 51 Nm टॉर्क निर्माण करते. ही कार भारतातली सर्वात छोटी आणि स्वस्त कार होती, जी त्यांनी सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बनवली होती.

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली

फेरारी कॅलिफोर्निया (Ferrari California) :

फेरारीने लाँच केलेल्या, रतन टाटा यांच्या कलेक्शनमध्ये समाविष्ट असलेली सर्वात लोकप्रिय, लक्झरी कारपैकी ही एक म्हणजे फेरारी कॅलिफोर्निया. फेरारी कॅलिफोर्निया 4.3-लिटर V8 इंजिनद्वारे समर्थित आहे, जे 490 PS आणि 504 Nm पीक टॉर्क जनरेट करते, ज्यामुळे क्विक ॲक्सलरेशन आणि ३०० किमी प्रतितासपेक्षा जास्त वेग मिळू शकतो.

होंडा सिविक (Honda Civic) :

रतन टाटा यांची होंडा सिविक कार खूप प्रसिद्ध आहे. ते अनेकदा या कारमध्ये प्रवास करताना दिसले आहेत आणि असे म्हटले जाते की, होंडा सिविक त्यांच्या दैनंदिन वापराची गाडी होती. 1,8 L I-VTEC पेट्रोल इंजिन आहे, जे 130 bhp आणि 172 Nm टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर हे मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले होते.

हेही वाचा…Car Insurance : कार इन्शुरन्सअचे तुम्हाला मिळणार नाहीत पैसे; ‘या’ चुका करत असाल तर आजच टाळा

मसेराती क्वाट्रोपोर्टे (Maserati Quattroporte) :

रतन टाटांकडे Maserati Quattroporte ही लक्झरी कारदेखील (Ratan Tata Car Collection) आहे. टाटांच्या कलेक्शनमधील मासेराती क्वाट्रोपोर्टे ही कार 3.8 एल ट्विन-टर्बो V8 इंजिनद्वारे समर्थित आहे, जे 523 hp आणि 710 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार लांब अंतराच्या ड्राइव्हसाठी हाय परर्फोमन्स आणि आराम देते. ही कार रतन टाटांच्या आवडत्या कारपैकी एक आहे.

टाटा नेक्सॉन (Tata Nexon ) :

रतन टाटांकडे असणाऱ्या या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये 1.5 टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे 108 bhp आणि 260 Nm टॉर्क जनरेट करते, यामुळे गाडीला चांगली गती, इंधन कार्यक्षमता, सुरक्षितता मिळते. एसयूव्हीने ५ स्टार NCAP सुरक्षा रेटिंग मिळवली आहे, ज्याचा अर्थ ही गाडी खूप सुरक्षित आहे. यामुळे रतन टाटा यांनी या गाडीची निवड करताना सुरक्षा, परफॉर्मन्स दोन्हींचा विचार केला आहे.तर या गाड्या रतन टाटा यांच्या मालकीच्या (Ratan Tata Car Collection) आहेत.

पोस्ट नक्की बघा…

त्याचप्रमाणे टाटा उद्योग समुहाला मोठ्या उंचीवर नेणाऱ्या रतन टाटा यांची ड्रीम कार ‘टाटा इंडिका’ (Ratan Tata Car Collection) आहे. टाटा इंडिका डिझेल आणि पेट्रोल इंजिन पर्यायांसह ऑफर करण्यात आली होती. त्याचे इंजिन १४०५ सीसी चे होते. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह येत असे. इंडिका ही ५ सीटर कार होती. त्याची लांबी ३६८५ मिमी, रुंदी १६२५ मिमी आणि व्हीलबेस २४०० मिमी होती. तसेच ही कार त्यांच्या हृदयाच्या खूप जवळची होती.