Ratan Tata Car Collection In Marathi : टाटा समूहाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष रतन टाटा यांचे काल ९ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. रतन टाटा हे अतिशय दानशूर व्यक्ती होते. आपल्या समाजकार्यासाठी ओळखले जाणारे रतन टाटा हे नेहमीच शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित कार्यासाठी निधी देत होते. करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अगदी डॉक्टरांसाठी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यापासून ते अन्नाची पाकिटे पुरवण्यापर्यंत अनेक माध्यमांमधून टाटा ग्रुप करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये उतरले होते. रतन टाटांच्या अनेक आवडी निवडी होत्या; त्यापैकी एक म्हणजे ‘गाड्यांचे प्रचंड वेड’ (Ratan Tata Car Collection) होते. ते क्वचितच महागड्या गाड्यांमध्ये फिरताना दिसायचे, तर रतन टाटा यांच्या मालकीच्या पाच खास कारबद्दल जाणून घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा