Ratan Tata Car Collection: महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने उद्योगरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. पहिलाच पुरस्कार उद्योजक रतन टाटा यांना जाहीर करण्यात आलेला आहे. रतन टाटा हे टाटा समूहाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांना उद्योग आणि व्यापार क्षेत्रात चांगल्या कामगिरीसाठी २,००० मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. रतन टाटा यांच्या टाटा ग्रुपच्या कंपन्या दानशूरपणाबद्दल ओळखल्या जातात. देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चला या निमित्ताने टाटा मोटर्सची मालकी आणि जॅग्वार-लँडरोवर सारख्या आलिशान कार तयार करणाऱ्या टाटांची आवडती कार कोणती पाहूया…
टाटांची सर्वात आवडती कार
देशातले सर्वात प्रसिद्ध आणि तितकेच महत्त्वकांक्षी उद्योगपती रतन टाटा यांना कार्सची आणि विमानांची खूप आवड आहे. त्यांच्याकडे अगदी रेग्युलर हॅचबॅक कारपासून ते लग्झरी कार्सपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत. रतन टाटांकडे नॅनो या कारचं इलेक्ट्रिक व्हर्जन देखील आहे. नॅनो ही टाटांची सर्वात आवडती कार आहे.
Tata Nexon
Tata Nexon ही कार रतन टाटांच्या ताफ्यात देखील आहे. ही टाटा देशातली सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. या कारची किंमत ७.६० लाख रुपयांपासून सुरू होते.
(हे ही वाचा : Royal Enfield च्या स्वस्त बाईकसमोर कोणीच टिकले नाय! खरेदीसाठी रांगा, ११ महिन्यांत २ लाखांहून अधिक विक्री )
Maserati Quattroporte
रतन टाटांकडे Maserati Quattroporte ही लक्झरी कार देखील आहे. या कारची किंमत २.११ कोटी रुपये इतकी आहे. ही टाटांच्या कार आवडत्या कारपैकी एक आहे.
Mercedes Benz-S-class
टाटांच्या ताफ्यातली Mercedes Benz-S-class ही एक हायस्पीड कार आहे. या कारची एक्स शोरूम किंमत १.६२ कोटी रुपये इतकी आहे.
Mercedes-Benz 500 SL
रतन टाटांच्या आलिशान कार कलेक्शनमध्ये Mercedes-Benz 500 SLचा देखील समावेश आहे. ही कार ८.१ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते.
(हे ही वाचा : Creta, Vitara चा खेळ संपणार? देशात नव्या अवतारात दाखल झाली सनरूफसह ३२ सेफ्टी फीचर्स असलेली कार )
Land Rover Freelander
रतन टाटा यांच्याकडे Land Rover Freelander ही कार देखील आहे. २०१४ मध्ये कंपनीने ही कार त्यांच्या पोर्टफोलिओतून हटवली. या कारचं एक मॉडेल रतन टाटा यांच्या गॅरेजमध्ये आहे.
तसेच काही दिवसापूर्वीच रतन टाटा यांनी देशातील पहिल्या स्वदेशी कार ‘इंडिका’चा वाढदिवस साजरा केला. ही कार बाजारात आली, त्यावेळी ती ग्राहकांच्या पसंतीस उतरली. या कारने शहरीभागासोबतच ग्रामीण भागातही जोरदार विक्री केली. पॅसेंजर कार सेगमेंटमध्ये या कारने धुमाकूळ घातला. टाटा मोटर्सने पहिल्यांदा १९९८ मध्ये इंडिका भारतीय बाजारात सादर केली होती. त्यावेळी या कारला भारतीयांनी भरपूर प्रेम दिले.