टाटा मोटर्सने काही वर्षांपूर्वी टाटा नॅनो ही कार लाँच करून संपूर्ण ऑटो क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर मागणी कमी झाल्याने कंपनीने ती बंद केली. आता Electra EV ने त्याच नॅनो कारचे इलेक्ट्रिक व्हेरियंट तयार केले आणि रतन टाटा यांना भेट दिली. या कारमधून उद्योगपती रतन टाटा यांनी प्रवास केला. इलेक्ट्रिक ईव्ही कंपनीने या खास प्रसंगाचा फोटो लिंक्डइनवर शेअर केला आहे. यामध्ये उद्योगपती रतन टाटा कारजवळ उपस्थित असल्याचे दिसत आहेत. रतन टाटा यांचे सहकारी शंतनू नायडू देखील फोटोत नॅनो ईव्हीसोबत दिसत आहेत.

“टीम इलेक्ट्रा EV साठी हा एक गौरवाचा क्षण आहे. कारण टाटाचे संस्थापक कस्टमाइज्ड ७२ व्या नॅनो इलेक्ट्रिक कारमध्ये प्रवास करतात. टाटा यांना नॅनो ईव्ही डिलिव्हर करताना आणि त्यांच्या अमूल्य अभिप्राय मिळवताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो,” असं इलेक्ट्रा इव्ही कंपनीने लिहिले आहे.

नॅनो इव्ही ही चार सीटर कार आहे आणि तिची रेंज १६० किमी आहे. ही कार १० सेकंदांपेक्षा कमी वेळेत शून्य ते ६० किमी प्रतितास वेग वाढवते. यामध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. या कारबद्दल टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की, यामुळे कारचा खरा अनुभव येतो. आधुनिक ग्राहकांना इको-फ्रेंडली वैयक्तिक वाहतूक प्रदान करण्याच्या आमच्या प्रयत्नात कोणतीही तडजोड केलेली नाही. या कस्टम बिल्ट नॅनो ईव्हीमध्ये 72V आर्किटेक्चर वापरण्यात आले आहे. टिगोर ईव्हीमध्येही हीच पॉवरट्रेन वापरली गेली आहे. कंपनीने त्याच्या डिझाइनमध्ये काही बदल केले आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) द्वारे प्रमाणित २१३ किमीची रेंज गाठली. असे करताना कंपनीने पॉवरट्रेनमध्ये कोणतेही भौतिक बदल केले नाहीत. टाटा मोटर्सने २०१८ मध्ये नॅनो कॉम्पॅक्ट कारचे उत्पादन बंद केले. ज्या वर्षी कंपनीच्या साणंद उत्पादन प्रकल्पात फक्त एक युनिट असेंबल करण्यात आले होते. कंपनी सध्या भारतात तिच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्याचा भाग म्हणून Nexon EV आणि Tigor EV ऑफर करते.