Ravi Teja Buys Fancy Number for EV Car: ज्याच्याकडे डॅशिंग मल्टीपल कार तो खरा ट्रेंडी सुपरस्टार. असा समाजमाध्यमांवर एक कयास आहे. म्हणूनच की काय सिने अभिनेते महागड्या कार खरेदी करत असतात. नुकताच साऊथचा एक सिने सुपरस्टार सध्या चर्चेत आला आहे त्याच्या इलेक्ट्रीक कार वरून. साऊथ चित्रपटांचा सुपरस्टार रवी तेजा त्याच्या कारच्या आवडीसाठी ओळखला जातो. त्याच्या कलेक्शनमध्ये मर्सिडीज बेंझ, ऑडी, बीएमडब्ल्यू इत्यादी एकापेक्षा जास्त कार आहेत. मात्र, आता त्याने आपल्या कलेक्शनमध्ये इलेक्ट्रिक कारचीही भर घातली आहे.
सुपरस्टार रवी तेजाने खरेदी केली ‘ही’ इलेक्ट्रीक कार
नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासोबतच रवी तेजाने या कारसाठी फॅन्सी नंबरही निवडला आहे. नवीन गाड्यांच्या नोंदणीच्या वेळी तो दिसला आहे. रवी तेजाची नवीन कार BYD Auto ३ आहे, तिची किंमत ३४.४९ लाख रुपये इतकी आहे. या मनपसंतीच्या कारमुळे तो सध्या समाजमाध्यमांवर चर्चेत आहे.
(हे ही वाचा : सचिन तेंडुलकरकडे आलिशान कारची लाईन लागल्ये, पण.. पहिली कार कोणती? पाहा कलेक्शन किंमत ऐकून थक्क व्हाल )
काय आहे ‘या’ कारमध्ये खास ?
BYD Ato ३ बद्दल बोलायचे झाले तर त्याला परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक मोटर २०१ एचपी पॉवर आणि ३१० न्यूटन मीटर टॉर्क प्रदान करते. BYD Eto ३ इलेक्ट्रिक SUV मध्ये ६०.४८ kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, कार फक्त ७.३ सेकंदात
० ते १०० किमी/ताशी वेग पकडू शकते. BYD Eto ३ एका चार्जवर ५२१ किमी अंतर पार करू शकते. यात मोठा बॅटरी पॅक देण्यात आला आहे.
बॅटरी
हा बॅटरी पॅक DC फास्ट चार्जरसह ५० मिनिटांत ८० टक्क्यांपर्यंत असेल. कंपनीच्या या एसयूव्हीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. BYD eto ३ ला BYD dPilot नावाची L२ प्रगत ड्रायव्हिंग सहाय्य प्रणाली देखील मिळते. यात ७ एअरबॅग्ज, पॅनोरॅमिक सनरूफ, १२.८-इंच (३२.५ सेमी), ३६०° होलोग्राफिक पारदर्शक इमेजिंग सिस्टम, मोबाइल पॉवर स्टेशन लोड करण्यासाठी वाहन यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. आत्तापर्यंत याला देशभरातून २००० हून अधिक ऑर्डर मिळाले आहेत.
रवी तेजाचा ‘हा’ आहे युनिक नंबर
रवी तेजाने त्याच्या इलेक्ट्रिक कारसाठी ‘२६२८’ हा नंबर निवडला आहे. भारतात अशा अडकलेल्या क्रमांकांसाठी ई-लिलावात भाग घ्यावा लागतो. लोकप्रियता आणि मागणीनुसार क्रमांकांचे वर्गीकरण केले जाते.