फॉर्म्युला वन शर्यत तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. हवेच्या वेगाशी स्पर्धा करणाऱ्या खेळाडूंना बघताना अंगावर रोमांच उभे राहतात. अनेक फॉर्म्युला वन रेसर तरुणाईमध्ये प्रसिद्ध आहेत. आता हीच Formula One वेगवान कार मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसणार आहे.रेड बुल इंडिया आणि ओरॅकल रेड बुल रेसिंग यांच्या तर्फे फॉर्म्युला वनचे फॅन असणाऱ्यांसाठी ‘रेड बुल शो रन’ चे आयोजन करण्यात आले आहे. याचे आयोजन वांद्रे येथील बसस्टॅण्डच्या रस्त्यांवर करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Red Bull Show Run

हा रन शो १२ मार्च ०२३ रोजी वांद्रे येथे होणार आहे. F 1 च्या आधी ऑस्ट्रियाच्या संघाचे प्रात्यक्षिक मुंबईतील वांद्रे बसस्टँड येथे होणार आहे. ११ मार्च रोजी माध्यमांसाठी स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केल्याच्या बातम्या येत असल्या तरी टीम ने याबद्दल अद्याप अतिरिक्त दिवसाची पुष्टी केलेली नाही आहे. फॉर्म्युला वन ग्रँड प्रिक्स १३ वेळा जिंकणारा डेव्हिड कोलथर्ड हा चाहत्यांना आपले कौशल्य दाखवणार आहे. डेव्हिड हा १४ वर्षांनी मुंबईत येणार आहे. या आधी तो २००९ च्या ‘शो रन’ साठी मुंबईत आला होता.

हेही वाचा : Upcoming Hyundai Cars 2023: Hyundai Verna पासून Stargazer MPV पर्यंत ह्युंदाई लॉन्च करणार ‘या’ पाच कार्स

हा कार्यक्रम सकाळी १० वाजता सुरु होणार आहे. शक्यतो F 1 शो च्या सुरुवातीला रेड बुल अ‍ॅथलिट आणि लिथुआनियन फ्री स्टाईल स्टंट बाइकर अरास गिबिजा देखील या ‘शो रन’ दरम्यान त्याचे धाडसी स्टंट दाखवणार आहे. तसेच यामध्ये सुपर कार क्लबच्या सुपर कार शोकेसचाही समावेश असणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Red bull f1 showrun at bandra bus stand david coledard mumbai tmb 01