Renault 4 electric suv : रेनॉल्टने पॅरिस मोटर शोमध्ये आपली नवी रेट्रो स्टाईल इलेक्ट्रिक एसयूव्ही चाहत्यांसाठी सादर केली आहे. हे कन्सेप्ट मॉडेल असून २०२५ मध्ये तिला लाँच केले जाईल. ही रेनोच्या सीएमएफ आणि बीईव्ही आर्किटेक्चरवर डिजाईन होणारी दुसरी कार असणार आहे. या कारची निर्मिती फ्रांसमधील कंपनीच्या नव्या इलेक्ट्रिसीटी हबमध्ये होणार आहे. ही कार कोणत्या खास वैशिष्ट्यांसह ग्राहकांसाठी उपलब्ध होणार, याबाबत जाणून घेऊया.

कारचे आकार

रेनॉल्ट ४ कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्हीची लांबी ४ हजार १६० मिलीमीटर आहे. वाहनाची रुंदी १ हजार ९५० मिमी आणि उंची १ हजार ९०० मिमी आहे. या वाहनाचा व्हिलबेस २ हजार ५७० एमएमचा आहे. कन्सेप्ट मॉडेलमध्ये २५५/५५ सेक्शनच्या टायरसह १९ इंचचे व्हिल उपलब्ध होते. मात्र विक्रीसाठी तयार होणाऱ्या मॉडेलमध्ये १६ किंवा १७ इंच व्हिल्सचा वापर होण्याची शक्यता आहे. या एसयूव्हीचे ग्राउंड क्लिअरंस २०० मिमी आहे.

कारचे डिजाईन

कारमध्ये रेनॉल्ट ४ एलशी मिळत्या जुळत्या स्टाइलिंग एलिमेंट्ससह आकर्षक बाह्य डिजाईन देण्यात आले आहे. कन्सेप्ट मॉडेलमध्ये बोनेट, बंपर आणि अँगल रिअर सेक्शन उपलब्ध आहे. मागील चाकांवर ट्रेपोजॉइडल साइड विंडो देण्यात आली आहे. विक्रीसाठी तयार झालेली कार थोड्या वेगळ्या डिजाईनसह मिळेल. रेनोने एसयूव्हीच्या आतील भागाबाबत खुलासा केलेला नाही. मात्र कार मोठ्या कॅबिनसह येणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

(नवीन टीव्हीएस रायडर १२५ आज होणार लाँच; पल्सर, शाईनला देणार टक्कर, जाणून घ्या किंमत आणि फीचर)

रेनॉल्ट ४ इलेक्ट्रिक एसयूव्हीची रेंज

या एसयूव्हीमध्ये ४२ केडब्ल्यूएच निकल कोबाल्ट मॅगनीज बॅटरी पॅक असणार आहे. अहवालांनुसार, नवीन मॉडेल फुल चार्ज झाल्यावर ४०२ किमीची रेंज देऊ शकते. कारच्या इलेक्ट्रिक मोटरला फ्रंट एक्सेलवर बसवण्यात आले आहे. कार ० ते १०० किमी प्रति तास वेग केवळ १० सेकंदात गाठेल, असा कंपनीचा दावा आहे.