Renault ही एक फ्रान्समधील कार उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवी एसयूव्ही आणि अनेक प्रकारचे मॉडेल कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करत असते. रेनॉल्ट कंपनी आपल्या नवीन डस्टर एसयूव्हीवर काम करत आहे. Renault नेने २०१३ मध्ये पहिल्या जनरेशनची Duster लॉन्च केली होती. नंतर २०२० मध्ये बंद करण्यात आली होती. रेनॉल्ट कंपनी निवडक आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दुसऱ्या जनरेशनच्या डस्टरची विक्री करत आहे. मात्र अजून त्या मॉडेलचे लॉन्चिंग भारतीय बाजारपेठेत करण्यात आले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन तिसरी जनरेशच्या रेनॉल्टचे Duster चे उत्पादन स्थानिक पातळीवर सुरु होईल आणि हे आर्थिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. हे नवीन मॉडेल CMF-B मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. कंपनी ज्या एसयूव्हीवर काम करत आहे ती पहिल्या एसयूव्हीच्या आकारापेक्षा मोठी असून, यात वापरणाऱ्याला केबिनमध्ये जास्त जागा मिळणार आहे. Creta आणि Alcazar प्रमाणे रेनॉल्ट नवीन डस्टर दोन सीटिंग लेआउट म्हणजे ५ आणि ७ सीटरमध्ये लॉन्च करणार आहे. ५ सीटर या मॉडेलची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos, VW Taigun, Skoda Kushaq आणि MG Astor यांच्याशी असणार आहे.

हेही वाचा : GT Battista: महिंद्राने लाँच केली जगातील सर्वात वेगवान कार; अवघ्या दोन सेकंदात मिळतो ‘इतका’ स्पीड

रेनॉल्ट निसान CMF-B प्लॅटफॉर्मचे स्थानिकीकरण होण्यास वेळ लागणार आहे. हा प्लॅटफॉर्म फ्युचर प्रूफ असेल आणि येणाऱ्या सुरक्षा मानकांशी अनुरूप असणार आहे. तसेचहे प्लॅटफॉर्म हायब्रीड आणि ईव्ही पॉवरट्रेनसह इलेक्ट्रिक पॉवरट्रेनला देखील सपोर्ट करेल. रेनॉल्ट सध्याच्या काळामध्ये भारतात अर्काना कूप क्रॉसओवरची टेस्टिंग करत आहे. रेनॉल्ट २०२३मध्ये बाजारामध्ये क्रॉसओवर लॉन्च करू शकते.तसेच रेनॉल्ट इलेक्ट्रिक Kwid लॉन्च करण्याचा देखील विचार करत आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renault car manufacturer is going to launch the 3rd generation duster tmb 01
Show comments