Renault Launched CNG Kits For Three Variants : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत सीएनजी कार तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. त्यामुळे मार्केटमध्ये पेट्रोल, डिझेल आणि ईव्हीबरोबर सीएनजी गाड्यांनाही मोठी मागणी आहे. त्यामुळे रेनॉल्टदेखील या टेक्निकसह त्यांच्या कारसाठी ऑफर देऊ करीत आहे. रेनॉल्ट कंपनी त्यांच्या तीन गाड्यांवर सीएनजी किट (CNG Kits) देणार आहे. कोणत्या आहेत या गाड्या, सीएनजी किट लावण्याची किंमत काय असणार ते चला सविस्तर जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता रेनॉल्ट कंपनीने त्यांच्या क्विड (Kwid), ट्रायबर (Triber) व किगर (Kiger)साठी सीएनजी किट (CNG Kits) भारतात लाँच केले आहेत. हे सीएनजी रेट्रो किट्स सुरुवातीला भारतातील हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात व महाराष्ट्र या पाच राज्यांमध्ये आणि टप्प्याटप्प्याने इतर राज्यांमध्येसुद्धा उपलब्ध करून दिले जातील. तसेच कंपनीचे म्हणणे आहे की, हे किट्स तीन वर्षांच्या वॉरंटीसह देण्यात येणार आहेत.

रेनॉल्ट सीएनजी किट (CNG Kits)

सीएनजी किटचा भारतातील रेनॉल्टच्या विक्रीत ६५ टक्के वाटा आहे. रेनॉल्ट कंपनी म्हणते की, सीएनजी रेट्रोफिटमेंट किट ऑटोमॅटिक आणि टर्बो व्हेरिएंट वगळता सर्व प्रकारच्या मॉडेल्ससाठी उपलब्ध असणार आहे. सीएनजी किटमुळे ग्राहक त्यांच्या रेनॉल्ट कारमध्ये सीएनजी किट बसवून, सीएनजी आणि पेट्रोल अशा दोन्ही प्रकारच्या इंधनावर कार चालवू शकतील.

रेनॉल्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम एम. म्हणाले की, आम्ही नेहमीच नवीन टेक्निक आणि पर्यावरणपूरक पद्धतींवर काम करीत असतो. त्या अनुषंगाने आम्ही आमच्या सर्व मॉडेल्समध्ये Government अप्रूव्‍ह्ड सीएनजी किट बसविण्याचा ऑप्शन ग्राहकांना दिला आहे. ग्राहक त्यांच्या रेनॉल्ट कारमध्ये सीएनजी किट बसवून सीएनजी, तसेच पेट्रोलवर कार चालवू शकतील.

सीएनजी किटची किंमत ७५ हजार रुपयांपासून सुरू होते. रेनॉल्ट क्विडसाठी सीएनजी रेट्रो किटची किंमत ७५ हजार रुपये, तर ट्रायबर व किगरच्या किटची किंमत ७९ हजार ५०० रुपये आहे. तसेच रेनॉल्टने या किटची क्षमता किंवा सीएनजीवर गाडी चालविताना वाहनाच्या शक्तीतील बदलाविषयी अधिक तपशील शेअर केलेले नाहीत.