Renault Kwid discontinued: मारुती अल्टो गेली अनेक वर्षे भारतीय बाजारपेठेत ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. ही भारतातील सर्वात स्वस्त कार देखील आहे. Renault Kwid ने भारतीय बाजारपेठेत थेट स्पर्धा दिली आहे. जसे मारुती अल्टो दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – ८००cc आणि १०००cc. त्याचप्रमाणे रेनॉल्टने क्विड हे दोन इंजिन पर्यायांसह सादर केले. तथापि, रेनॉल्ट इंडियाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून Kwid 800cc आवृत्ती काढून टाकली आहे. म्हणजेच, हॅचबॅकचे ०.८-लिटर पेट्रोल इंजिन बंद करण्यात आले आहे. हा इंजिन पर्याय कारच्या RXL आणि RXL (O) प्रकारांमध्ये विकला जात होता.
Renault Kwid किंमत
८०० cc इंजिन असलेल्या Renault Kwid ची किंमत ४.३ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर, Renault Kwid आता फक्त १.०-लीटर पेट्रोल इंजिन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. आतापर्यंत कंपनीकडून हे इंजिन बंद करण्याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु देशातील नवीन BS6 फेज 2 आणि RDE उत्सर्जन मानदंडांच्या रोल-आउटमुळे असे मानले जाते.
(हे ही वाचा : फक्त ५.२५ लाख रुपये किंमत अन् 26Km चे मायलेज; मारुतीच्या ‘या’ ७ सीटर कारनं Tata Punch ला पछाडलं )
इंजिन आणि पॉवर
Kwid ८०० चे ०.८-लिटर पेट्रोल इंजिन ५२bhp कमाल पॉवर आणि ७२Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम होते. इंजिनला पाच-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडले गेले. ते १ लिटरमध्ये २०KM पर्यंत मायलेज देण्यास सक्षम होते.
दरम्यान, रेनॉल्ट भारतात मास-मार्केट इलेक्ट्रिक वाहन बनवण्याच्या विचारात आहे. अहवालानुसार, रेनॉल्ट आपल्या क्विड हॅचबॅकची मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक आवृत्ती लाँच करण्याचा विचार करत आहे. ते स्थानिक घटकांसह ईव्ही बनवण्याची मागणी, किंमत आणि व्यवहार्यतेचे देखील मूल्यांकन करत आहे. ही EV २०२४ च्या अखेरीस लाँच केली जाऊ शकते.