Renault India announces Night and Day limited edition : सणासुदीच्या निमित्ताने अनेक कार कंपन्या त्यांच्या नवनवीन गाड्या बाजारात घेऊन येतात आणि ग्राहकांचा आनंद द्विगुणित करतात. तर, आता रेनॉल्ट इंडियाने (Renault India) किगर (Kiger), ट्रायबर (Triber) व क्विड (Kwid) या लोकप्रिय मॉडेल्सच्या नाइट ॲण्ड डे लिमिटेड एडिशन (Night and Day limited edition) लाँच करण्याची घोषणा केली आहे; ज्यात स्टायलिश डिझाइन, मॉडर्न फीचर्सवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नाईट ॲण्ड डे लिमिटेड एडिशन तीन मॉडेल्समध्ये पर्ल व्हाइटसह मिस्ट्री ब्लॅक रूफ, ड्युअल-टोन बॉडी कलर असणार आहे; जे आकर्षक लूक प्रदान करतील.

फीचर्स :

१. ट्रायबर, कायगरचे आरएक्‍सएल व्‍हेरिएंट आणि क्विडवरील आरएक्‍सएल (ओ) व्‍हेरिएंटवर आधारित ही नवीन एडिशन ग्राहकांना योग्य किमतीत उपलब्ध होईल.

२. फर्स्ट-इन-सेगमेंट, पर्ल व्हाईट ड्युअल-टोन, एक्स्टेरियर बॉडी थीम लोअर व्हेरियंटला स्टायलिश डिझाइन देतो.

३. त्याचबरोबर व्हील कव्हर्स, ग्रिल इन्सर्ट, मॉडेल नेमप्लेट्स, किगर व ट्रायबरवर ओआरव्हीएम (मागील दृश्य दिसणारे मिरर), कायगरवर पियानो ब्‍लॅक टेलगेट गार्निश आदी फीचर्सचा समावेश आहे.

हेही वाचा…Honda : एक लिटर पेट्रोलमध्ये १७ किलोमीटर धावणार; नवीन SUV चे फीचर्स, किंमत जाणून घ्या

४. किगर आणि ट्रायबर नाईट ॲण्ड डे लिमिटेड एडिशनवरील मॉडर्न फीचर्समध्ये नऊ इंच टचस्क्रीन वायरलेस स्‍मार्टफोन रिप्‍लिकेशन, रिअर व्‍ह्यु कॅमेरा, ट्रायबरवरील रिअर पॉवर विंडों असणार आहे.

५. सर्व मॉडेल्‍ससाठी या लिमिटेड सीरिजअंतर्गत १,६०० युनिट्स उपलब्‍ध असतील.

रेनॉल्ट नाईट ॲण्ड डे लिमिटेड एडिशन : ह्युमन फर्स्ट प्रोग्राम

ह्युमन फर्स्ट प्रोग्रामचा भाग म्हणून रेनॉल्ट (Renault) इंडियाने नवीन मॉडेल्स नाइट ॲण्ड डे लिमिटेड एडिशन ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्ससह असणार आहेत; जी अपघातांचा धोका कमी करून, रहिवासी, पादचाऱ्यांसाठी सुरक्षितता मिळेल या दृष्टीने डिझाइन केलेली आहेत. सर्व व्हेरिएंट सीटबेल्ट रिमाइंडरसह येतात. किगर आणि ट्रायबर १५ पेक्षा जास्त स्टॅण्डर्ड सेफ्टी फीचर्स, तर Kwid मध्ये १४ पेक्षा जास्त स्टॅण्डर्ड सेफ्टी फीचर्स असणार आहेत. तसेच कंपनीने जाहीर केले की, नाईट ॲण्ड डे लिमिटेड एडिशनसाठी रेनॉल्ट-अधिकृत (Renault) डीलरशिपवर १७ सप्टेंबर २०२४ पासून बुकिंग सुरू झाली आहे.

किंमत :

ट्रायबर : ७,००,००० रुपये (ट्रायबर आरएक्‍सएल मॅन्‍युअलवर अतिरिक्‍त २० हजार रुपये)
कायगर : ६,७४,९९० रुपये (कायगर आरएक्‍सएल मॅन्‍युअलवर अतिरिक्‍त १५ हजार रुपये)
कायगर : ७,२४,९९० रूपये (कायगर आरएक्‍सएल ईजी-आर एएमटीवर अतिरिक्‍त १५ हजार रुपये)
क्विड : ४,९९,५०० रूपये (क्विड आरएक्‍सएल(ओ) मॅन्‍युअलप्रमाणे किंमत)