Renault Kiger Launch: Renault आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स आणि अपडेटेड मॉडेल्स लॉन्च करतच असते. Renault India ने आज आपल्या Renault Kiger ची अपडेटेड सिरीज लॉन्च केली आहे. यासोबतच कंपनी नवीन RXZ वेरिएंट 2023 वर उत्तम ऑफर देखील देत आहे. ज्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात.
Renault Kiger RXT चे फीचर्स
नवीन Renault Kiger या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास ते हे मॉडेल दोन इंजिन पर्यायनसह लॉन्च करण्यात आले आहे. ज्यामध्ये पहिले इंजिन हे १.० लिटरचे टर्बो पेट्रोल आणि दुसरे हे १.० लिटरचे एनर्जी पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. एका लिटरमध्ये ही कार २०.६२ किमी धावेल असा दावा कंपनीने केला आहे.
सेफ्टी फीचर्स
Renault Kiger 2023 मध्ये दिलेल्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम, हिल स्टार्ट असिस्ट (HSA), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS) आणि रेडी प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) फीचर्स देण्यात आली आहेत. याशिवाय यामध्ये फ्रंट साईडमध्ये ४ एअरबॅग आणि स्पीड सेन्सिंग डोअर लॉक तसेच चाईल्ड सेफ्टी फिचर देण्यात आले आहे.
Renault Kiger 2023 या कारशी स्पर्धा करणाऱ्या कारमध्ये Nissan Magnite, Tata Punch, Citroen C3 Mahindra Bolero, Hyundai Venue, Tata Altroz, Toyota Glaza, Tata Tigor CNG, Maruti Suzuki Baleno आणि Kia Sonnet या गाड्यांचा समावेश आहे.
काय आहे डिस्काउंट ऑफर
रेनॉल्ट कंपनीने आपल्या नवीन कारच्या RXT (O) मॉडेलमध्ये ८.० इंचाचा टचस्क्रीन, एलईडी हेडलॅम्प , टेल लॅम्प आणि १६ इंचाचे अलॉय व्हील्ससारखे फीचर्स दिली आहेत. कंपनीने या कारची किंमत ७.९९ लाख रुपये या किंमतीमध्ये सादर केली आहे. रेनॉल्टची ही नवीन कार खरेदी करताना ग्राहकांना २०,००० रुपयांचे एक्सचेंज बेनिफिट, १०,००० रुपयांचा कॅश डिस्काउंट, तसेच १२ हजार रुपयांचा कार्पोरेट डिस्काउंट आणि ४९,००० रुपयांपर्यंतचे लॉयल्टी बेनिफिट्स मिळू शकतात.