Renault ने आपल्या Kiger चे नवीन अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. कारचे बेस मॉडेल ५.९९ लाख रुपये एक्स-शोरूममध्ये ऑफर केले जाईल. ही कार बाजारपेठेतील किमतीच्या विभागात टाटा पंचशी स्पर्धा करेल. पंच ६ लाख रुपयांच्या एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. यामध्ये कंपनी CNG इंजिन देखील देत आहे. लवकरच या कारचे ईव्ही मॉडेलही लाँच करण्यात येणार आहे. आम्ही तुम्हाला या दोन वाहनांच्या फीचर्स आणि मायलेजबद्दल माहिती देत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

2024 Renault Kiger मध्ये काय आहे खास?

नवीन 2024 Renault Kiger चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. कारचे टॉप मॉडेल १०.२९ लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये सादर केले जाईल. यामध्ये ऑटो फोल्डिंग ORVMs देण्यात आले आहेत. याशिवाय कारला सेमी-लेदर सीट्स आणि leather-wrapped व्हील देण्यात आले आहेत. या नव्या एसयूव्हीमध्ये रेड ब्रेक कॅलिपर देण्यात आले आहेत. कारमध्ये अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर दिले जात आहेत.

(हे ही वाचा : सुरक्षेच्या बाबतीत ‘या’ कारला तोड नाय! ६ एअरबॅग्स अन् ७० हून अधिक सेफ्टी फीचर्सवाली देशात येतेय SUV, बुकींगही सुरु )

2024 Renault Kiger इंजिन

2024 Renault Kiger च्या इंजिन पॉवरमध्ये कोणताही बदल झालेला नाही. यात ९९९ cc चे शक्तिशाली पेट्रोल इंजिन असेल. ही कार १८.२ kmpl ते १९.५२ kmpl विविध प्रकारांमध्ये मायलेज देईल. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये सुरक्षिततेसाठी या कारला ४ स्टार देण्यात आले आहेत. ही एक पाच सीटर कार आहे, ज्यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले जाईल.

टाटा पंच

ही पाच सीटर कार आहेत इंची इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. टाटा पंचचे बेस मॉडेल ६ लाख रुपये आणि टॉप मॉडेल १०.१० लाख रुपये (दोन्ही एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध आहे. ही एक हाय क्लास लुक कार आहे, यात प्रोजेक्टर हेडलॅम्प, क्लायमेट कंट्रोल, एलईडी टेल लॅम्प अशी वैशिष्ट्ये आहेत. कारला २६.९९ kmpl चे कमाल मायलेज मिळते. ही कार ११९९ सीसी इंजिनसह देण्यात आली आहे.