Return of Renault Duster to India: वाहन निर्माता कंपनी रेनॉल्ट इंडिया (Renault India) आपली लोकप्रिय एसयूव्ही रेनॉल्ट डस्टर (Renault Duster) लवकरच भारतात नव्या अवतारात लाँच करणार आहे. नवीन लूकसोबतच या कारमध्ये अनेक फीचर्स अपडेट्सही पाहायला मिळतील, असं बोलले जात आहे. रेनो डस्टरच्या न्यू जनरेशन मॉडलची लोकांना उत्सूकता आहे. आता ही एसयूव्ही जबरदस्त लूक आणि फीचर्स सोबत ह्युंदाई क्रेटा आणि मारुती सुझुकी ग्रँड विटारा तसेच किआ सेल्टॉस सारख्या कॉम्पॅक्ट आणि मिडसाइज एसयूव्हीला टक्कर देईल.
नवीन तिसरी जनरेशच्या रेनॉल्टचे Duster चे उत्पादन स्थानिक पातळीवर सुरु होईल आणि हे आर्थिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. हे नवीन मॉडेल CMF-B मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. कंपनी ज्या एसयूव्हीवर काम करत आहे ती पहिल्या एसयूव्हीच्या आकारापेक्षा मोठी असून, यात वापरणाऱ्याला केबिनमध्ये जास्त जागा मिळणार आहे. Creta आणि Alcazar प्रमाणे रेनॉल्ट नवीन डस्टर दोन सीटिंग लेआउट म्हणजे ५ आणि ७ सीटरमध्ये लॉन्च करणार आहे.
(हे ही वाचा : Nexon सोडून ‘या’ इलेक्ट्रिक कारच्या मागे लागले भारतीय, ५ मिनिटांच्या चार्जमध्ये मिळणार १०० किलोमीटरची रेंज )
Next Gen Renault Duster मध्ये काय असेल खास?
डस्टर हे कंपनीच्या प्रमुख उत्पादनांपैकी एक आहे. मात्र, कंपनीने या कारची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. नवीन डस्टर बाजारात येण्यास थोडा वेळ लागणार आहे. ज्यामध्ये रेनॉल्ट आपली काही ग्लोबल रेंज सीबीयू प्रोडक्ट्स बाजारात आणू शकते. रेनॉल्ट डस्टरमध्ये १.२ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल. जे 48V हायब्रिड टेक्नोलॉजी सोबत येईल. हे इंजिन १३०bhp पॉवर जनरेट करेल. न्यू डस्टरला ऑल व्हील ड्राइव्ह (AWD) सिस्टम सोबत आणले जावू शकते.
ही एसयूव्ही ४.३४ मीटर लांब असेल. यात शानदार इंटिरियर सोबत डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, मोटी स्क्रीन, वायरलेस चार्जिंग आणि स्मार्टफोन कनेक्टिविटी, ६ एयरबॅग्स, ऑटोमॅटिक एसी, ईबीडीसोबत एबीएस अनेक स्टँडर्ड आणि सेफ्टी फीचर्स पाहायला मिळू शकतात.