भारत एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये विश्वास ठेवणारा देश आहे. कुटुंबाने एकत्र देवदेर्शनाला, सहलीला जाण्याचा एक वेगळाच अनुभव असतो. मात्र अनेकवेळा छोटी गाडी किंवा कमी स्पेस असलेल्या कारमुळे कुटुंबातील सर्वांनाच एकत्र बाहेर फिरणे शक्य होत नाही. यासाठी तुम्हाला मग मोठी गाडी भाड्याने घ्यावी लागते किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरावी लागते. जास्त सीटिंग क्षमता असलेल्या सात सीटर एमपीव्ही (Multi-Purpose Vehicles) याबाबतीत तुमची अजिबात निराशा करणार नाही. अनेकांचा गैरसमज आहे की, चांगल्या एमपीव्ही कार खूप महाग येतात. पण असे नाही. अगदी परवडणाऱ्या किमतीतही चांगल्या एमपीव्ही कार येतात. आपण अशाच एका ७ सीटर एमपीव्ही कारची माहिती जाणून घेऊया, जी तुमच्या कुटुंबाला एकत्रित फिरण्याचा मस्त अनुभव देईल.

फ्रांसची प्रमुख वाहन निर्मिती करणारी कंपनी Renault ने आपल्या ७ सीटर Triber कारवर आकर्षक ऑफर दिली आहे. या गाडीची किंमत सहा लाखांपासून ते ८.६३ (एक्स शोरूम) लाखांपर्यंत आहे. आकर्षक डिझाईन आणि तगड्या परफॉर्मन्ससह सात सीटर क्षमता असलेली कार तुम्हाला नक्कीच आवडेल. जर तुम्हाला किफायतशीर दरात चांगली एमपीव्ही कार विकत घ्यायची असेल तर Triber एक चांगला पर्याय ठरू शकते.

Maharashtra ST Employees Congress General Secretary Srirang Barge allegation regarding ST employee pay hike credit
‘एसटी’ कर्मचारी वेतनवाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस म्हणते…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
नावातील साधर्म्याचा फायदा घेऊन १६ कोटींच्या शेअर्सची परस्पर विक्री
Alankrita Sakshi’s Success Story
Alankrita Sakshi : अलंकृतासारखे तुम्हीही Google मध्ये नोकरी मिळवू शकता; बीटेक, मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम अन् या आयटी स्कीलच्या जोरावर मिळवले ६० लाखांचे पॅकेज
father of rape victim change birth record to save accused
Jaipur Crime News : बाप नव्हे हैवान! बलात्कारी आरोपीला वाचवण्यासाठी स्वतःच्या मुलीची बदलली जन्मतारीख
Success Story An inspiring journey from selling balloons
Success Story: रस्त्यांवर फुगे विकण्यापासून ते करोडोंची कंपनी उभी करण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
Career mantra UPSC exam science NCERT
करिअर मंत्र
Victim Aryan Mishra
Aryan Mishra Murder: गायीच्या तस्करीच्या संशयावरून गोरक्षकांनी केली १२वी च्या विद्यार्थ्याची हत्या; ३० किमीपर्यंत केला पाठलाग

केवळ ५,९९९ रुपयांचा आकर्षक EMI

कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, मासिक ५,९९९ रुपयांच्या मासिक हप्तावर (EMI) ही कार तुम्ही घरी आणू शकता. यासाठी तुमचे एकूण कर्ज ३.७१ लाख असणे आवश्यक आहे. तसेच हप्त्याचा एकूण कालावधी ८४ महिने असायला हवा. जर तुम्ही कर्जाची रक्कम कमी-जास्त करत असाल तर साहजिकच आहे की मासिक हप्त्याची रक्कमही बदलेल. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, या ऑफरमध्ये तुम्हाला ॲक्सेसरीज किंवा इतर खर्च मोजलेला नाही.

Renault Triber

हो, पण गाडीचे फिचर्स काय आहेत?

या एमपीव्ही गाडीत डिटॅचेबल सीट सोबत सात सिट कॉन्फिगरेशनचा ऑप्शन देण्यात आला आहे. कंपनीने एक लीटर क्षमतेचा नॅच्यूरल एस्पायर्ड, तीन सिलिंडर पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे. ज्यामुळे ही गाडी ७२ पीएसची पॉवर आणि ९६ एनएम टॉर्क जनरेट करते. गाडीचे इंजिन ५ स्पीड म्यॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्सने युक्त आहे.

यासोबतच Renault Triber एक लीटरच्या टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनसोबतही येते, ज्याचे इंजिन १०० पीएसची पॉवर जनरेट करते. जर तुम्ही सर्वात मागे डिटॅचेबल सीट वापरता तेव्हा गाडीचा बूट स्पेस कमी होऊन ८५ लीटर पर्यंत येतो. तेच जर मागील सीट हटविल्या तर ६२५ लीटरचा बूट स्पेस मिळतो.

फिर्चस बाबत बोलायचे झाल्यास, Renault Triber मध्ये ८ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेमेंट सिस्टम दिली आहे. जी अँड्राईड ऑटो आणि ॲपल कार-प्लेला सपोर्ट करते. यासोबतच ॲडजस्टेबल ड्रायव्हिंग सीट, प्रोजेक्टर हँडलँप, LED टर्न इंडिकेटर्स, स्टियरिंग व्हिल म्युजिक आणि फोन कंट्रोल सारके फिचर्स दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेतील सीटसाठी एसी वेंट्स दिले आहेत. ज्यामुळे मागच्या बाजूलाही गारवा जाणवेल.

गाडी कोणतीही असो, सेफ्टी फर्स्ट. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर या कारमध्ये ४ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (EBD) याच्यासोबत अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), रिअर पार्किंग सेंसर आणि रिअर व्ह्यू कॅमेरा दिला गेला आहे. शेवटी भारतीय नागरिकांचा सर्वात आवडता प्रश्न, कितना देती है? Renault Triber प्रतिलिटर इंधनात १९ किमींचा मायलेज देते. आहे की नाही परफेक्ट फॅमिली कार.