Renault Triber Discount On 63,000 Rupees: सध्या अनेकांना थोड्या मोठ्या, सात सीटर कारची गरज पडू लागली आहे. फॅमिली मोठी होतेय, लगेजही वाढतेय. यामुळे सामान्य ग्राहकांना खिशाला परवडणारी अशी परंतू थोडी मोठी कार हवीय. सात सीटर कारमध्ये खिशाला परवडणारे खूप कमी पर्याय आहेत. त्यापैकीच एक रेनॉची ट्रायबर ही आहे. दरम्यान याच कारवर देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर कार रेनॉल्ट ट्रायबर मोठी सूट मिळत आहे. जर तुम्ही ही कार आता खरेदी केली तर तुम्हाला या कारवर ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा होईल. तसेच या डिस्काउंटमध्ये कोणत्या Benefits चा समावेश आहे? तसेच याची किंमत किती? कोणती फीचर्स आहेत? जाणून घेऊ सविस्तर…

MY24 ट्रायबरवर ६३,००० रुपयांची सूट

MY24 Renault Triber मॉडेलवर तुम्हाला एकूण ६३,००० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. या ऑफरमध्ये ३०,००० रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, १५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस, १०,००० रुपयांचा लॉयल्टी बोनस, ८,००० रुपयांचा कॉर्पोरेट बोनसचा आहे. हे डिस्काउंट ट्रायबरच्या सर्व व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. याशिवाय, RXE बेस व्हेरिएंटच्या RXE व्हेरिएंटवर फक्त लॉयल्टी बोनस दिला जात आहे.

MY25 ट्रायबरवर ४३,००० रुपयांची सूट

MY25 Renault Triber मॉडेलवर ४३,००० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये १०,००० रुपयांचे कॅश डिस्काउंट, १०,००० रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि ८,००० रुपयांचा कॉर्पोरेट बोनसचा समावेश आहे. हे डिस्काउंट ट्रायबरच्या सर्व व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. याशिवाय, लॉयल्टी बोनस फक्त RXE व्हेरिएंटवर मिळत आहे. ही ऑफर ३१ जानेवारी २०२५ पर्यंत वैध आहे.

फीचर्स

यात ५+२ सीटिंगचा पर्याय आहे. तसेच यामध्ये ७ लोक सहज बसू शकतात. परंतू यामध्ये जास्त बूट स्पेस नाही. फीचर्सबद्दल बोलायचे झाले या कारमध्ये 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जी Apple कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोशी कनेक्ट होऊ शकते.

सेफ्टी फीचर्स

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, याला चार एअरबॅग, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम(ESP), हिल स्टार्ट असिस्ट (HSA), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS), रिअर पार्किंग सेन्सर, रीअरव्ह्यू कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) मिळते. सारखे सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत.

Story img Loader