Cheapest 7-Seater Car: भारतीय बाजारपेठेत मोठ्या कुटुंबासाठी मोठ्या प्रमाणात एकापेक्षा एक जबदस्त कार उपलब्ध आहेत. मारुती सुझुकी एर्टिगा, टोयोटा इनोवा, फॉर्च्यूनर, महिंद्रा स्कॉर्पियो-एन, एक्सयूवी700, किआ कारेन्स अशा अनेक प्रकारच्या सात सीटर कार बाजारात उपलब्ध आहेत. सात सीटर सेगमेंटमध्ये टोयोटा इनोव्हा क्रिस्टा सर्वात लोकप्रिय आहे. मात्र, त्याची किंमत २० लाख रुपयांपासून सुरू होते. यामुळे ते सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर आहे. त्याच वेळी, या सेगमेंटमधील दुसरी सर्वात लोकप्रिय कार Ertiga आहे, ज्याची किंमत ८.६४ लाख रुपयांपासून सुरू होते.
अनेकदा कार खरेदी करण्यासाठी सर्वसामान्यांचे बजेट फार कमी असते. बहुतेक लोकांचे बजेट ७ लाख रुपये किंवा त्याहूनही कमी असते. या बजेटमध्ये फक्त हॅचबॅक आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात उपलब्ध आहेत. पण जर तुम्हाला सात सीटर कार घ्यायची असेल तर आता तुमचे स्वप्न सात लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत पूर्ण होऊ शकते. कारण आज आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या एका जबरदस्त सात सीटर कारबद्दल माहिती देणार आहोत. जी तुम्हाला स्वस्तात घरी आणता येईल.
Renault Triber ही देशातील सर्वात परवडणारी सात-सीटर MPV कार आहे. या कारची किंमत ६.३३ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ८.९७ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. हे MPV सेगमेंटमध्ये अद्ययावत वैशिष्ट्यांसह सर्वोत्तम जागा आणि आराम देते. कंपनी त्याची RXE, RXL, RXT आणि RXZ या चार प्रकारांमध्ये विक्री करत आहे. या कारमध्ये ८४ लीटरची बूट स्पेस आहे, जी तिसऱ्या रांगेतील सीट खाली फोल्ड करून ६२५ लीटरपर्यंत वाढवता येते.
(हे ही वाचा : ग्राहकांना धक्का! ‘या’ प्रसिध्द कंपनीच्या पेट्रोल-डिझेल कारची विक्री बंद, फक्त इलेक्ट्रिक गाड्या धावणार रस्त्यावर )
जर आपण वैशिष्ट्यांबद्दल बोललो तर, यात अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, स्टीयरिंग-माउंट ऑडिओ कंट्रोल्स आणि मोबाइल फोन कनेक्टिव्हिटी यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय, या MPV मध्ये पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, सेंटर कन्सोलमध्ये कूल्ड स्टोरेज आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे. याशिवाय, सामान्य की ऐवजी स्मार्ट कार्ड ऍक्सेस की त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, चार एअरबॅग, एबीएस विथ ईबीडी, रिअर पार्किंग सेन्सर आणि रिअर-व्ह्यू कॅमेराही उपलब्ध आहेत. ही कार ४-स्टार NCAP रेटिंगसह येते. या कारमध्ये कंपनीनं १.० लीटर क्षमतेचं ३ सिलिंडर असलेलं पेट्रोल इंजिन दिलं आहे. जे ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतं. हे इंजिन ७०bhp ची पॉवर आणि ९६Nm चा टॉर्क जनरेट करतं. या कारमध्ये ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड AMT गिअरबॉक्सचा पर्याय आहे. ट्रायबरचे मायलेज २० किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.