फ्रेंच कार निर्माता कंपनी रेनॉल्ट लवकरच आपली नवीन कार बाजारात आणणार आहे. कंपनी आपली सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही ‘रेनॉल्ट अर्काना’ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. रेनॉल्टची ही आगामी सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही रेनॉल्ट अर्काना चाचणी दरम्यान अनेक वेळा स्पॉट झाली आहे. रेनॉल्टची ही कार ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी होणार असल्याचे, बोलले जात आहे. जाणून घेऊया या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीची फीचर्स आणि किंमत…
फीचर्स
चाचणी दरम्यान समोर आलेल्या फोटोनुसार, रेनॉल्टच्या आगामी एसयूव्हीला मॅन्युअल तसेच स्वयंचलित गिअरबॉक्स मिळू शकेल. मात्र, या कारच्या लुक आणि फीचर्सबाबत रेनॉल्ट मोटर्सकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. रेनॉल्ट अर्कानाच्या या कारमध्ये अनेक उत्तमोत्तम अपग्रेड फीचर्स पाहायला मिळू शकतात. यानुसार, अर्कानाची लांबी ४,५४५ मिमी असू शकते. म्हणजेच ही कार बाजारातील इतर एसयूव्हीपेक्षा थोडी लांब असू शकते. याशिवाय, त्याची रुंदी १,८२० मिमी आणि उंची १,५६५ मिमी पर्यंत असू शकते.
आणखी वाचा : Used Bajaj Pulsar 180 : आकर्षक फायनान्स प्लॅनसह उपलब्ध; जाणून घ्या कुठे मिळेल स्वस्त डील
इंजिन
रेनॉल्ट अर्कानामध्ये २७२१ एमएमचा व्हीलबेस दिला जाऊ शकतो. यासह, त्याचे ग्राउंड क्लीयरन्स २०५/२०८ मिमी असेल. ही कार १.३ लीटर पेट्रोल इंजिनसह भारतीय बाजारात लॉन्च केली जाऊ शकते. सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही ई-टेक हायब्रिड आणि माइल्ड-हायब्रिड टेक पॅकसह ऑफर केली जाईल.
किंमत
रेनॉल्ट अर्काना ही कार सुमारे १० लाख रुपयांच्या किंमतीच्या श्रेणीमध्ये ऑफर केली जाऊ शकते. ही कार बाजारपेठेत
टाटा नेक्सॉन आणि मारुती ब्रेझा या दोंन्ही गाड्यांना टक्कर देईल.