भारतीय क्रिकेटपटूंमध्ये अनेकांना लग्झरी गाड्यांची आवड आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. या यादीत आणखी एका खेळाडूचा समावेश होतो तो म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा. रोहित शर्मालाही गाड्यांची खूप आवड आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा नुकताच त्याच्या लॅम्बोर्गिनी उरूससह विमानतळावर दिसला. या कारची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. विशेष म्हणजे, या कारचा रंग टीम इंडियाच्या टी-शर्टशी जुळणारा निळा आहे.

यूट्यूबवर कार्स फॉर यू ने व्हिडिओ क्लिप शेअर केला आहे. हे चॅनल वारंवार सेलिब्रिटींना त्यांच्या लक्झरी कारमध्ये पकडते. यावेळी, ते भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला शोधण्यात यशस्वी झाले. तो उरूसातून बाहेर पडून विमानतळावर प्रवेश करताना दिसत आहे. तो फोटोसाठी पोझ देतो. छायाचित्रे काढल्यानंतर तो विमानतळाच्या आवारात प्रवेश करतो. असे व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे.

horiba India Hydrogen vehicle
चाकणमध्ये हायड्रोजन वाहन इंजिन चाचणी सुविधा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
Union Ministry of Health will establish NCDC branch and MSU in Nagpur Municipal Corporation
संसर्गजन्य आजारावर प्रभावी उपाय: नागपुरात मेट्रोपोलीटन सर्वेलन्स युनिट…
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : संतप्त जमावाच्या मारहाणीतून बेस्ट बसचालक संजय मोरेचा जीव ‘या’ माणसामुळे वाचला!

(आणखी वाचा : झकास! बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा त्याच्या ‘या’ लक्झरी कारसोबतचा फोटो झाला व्हायरल )

Lamborghini Urus ‘अशी’ आहे खास

लॅम्बोर्गिनीची ही जगातील सर्वात वेगवान SUV कार आहे. लॅम्बोर्गिनीच्या या आलिशान कारला स्पोर्ट, Strada (स्ट्रीट), रॅली आणि Corsa (ट्रॅक) असे चार वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड्स मिळतात. या कारमध्ये कंपनीने ४.० लीटर ट्विन-टर्बो चार्ज्ड V8 इंजिन दिले आहे, जे ६६६hp पॉवर आणि ८५०Nm टॉर्क जनरेट करते. ही आलिशान कार केवळ ३.३ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडू शकते. इतकेच नाही तर या कारचा टॉप स्पीड ३०६kmph आहे.

Story img Loader