रॉयल इन्फिल्डच्या बाईक्स देशात लोकप्रिय आहेत. त्यांचा चाहतावर्ग फार मोठा आहे. शक्तीशाली बाइक्स म्हणून त्यांना ओळखल्या जाते. ३५० सीसी इंजिन असलेल्या रॉयल इन्फिल्डच्या बाइक्स खडतर आणि चढावाच्या मार्गावरून सहज पुढे जातात. त्यामुळे, अनेक लोक शिमला, मनाली सारख्या उंच ठिकाणी जाण्यासाठी तिचा वापर करतात. आज आम्ही तुम्हाला रॉयल इन्फिल्डच्या सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या बईक्सची माहिती देत आहोत. यावरून तुम्हाला कुठली बाईक्स घ्यायची हे ठरवण्यात मदत मिळेल.
३५० सीसी सेगमेंटमध्ये क्लासिक, मेटिओर आणि अलिकडे लाँच झालेली हंटर या बाईकचा समावेश आहे. रॉयल इन्फिल्डमध्ये अडव्हेंचर बाईक देखील मिळते. सप्टेंबर महिन्यात रॉयल इन्फिल्डच्या कोणत्या बाईक्सनी बाजारात धुमाकूळ घातला, याबाबत जाणून घेऊया.
- रॉय इन्फिल्ड मेटिओर ३५०
सप्टेंबर २०२२ मध्ये Royal Enfield Meteor 350 हिने सर्वाधिक विक्रीच्या यादीत तिसरे स्थान पटकाविले. या बाईकमध्ये ३५० सीसीचे इंजिन मिळते. ही क्रुजर बाईक आहे. प्रवास आरामदायक होण्यासाठी बाईकमध्ये समोरच्या दिशेने असलेले फुट पेग देण्यात आले आहेत. सरळ बसता येण्यासाठी तशी आसन व्यवस्था देण्यात आली आहे.
(आल्टोपेक्षा लहान असेल MG AIR EV, जाणून घ्या रेंज आणि किंमत)
बाईकमध्ये नवीन जे सिरिज इंजिन देण्यात आले आहे. रॉयल इन्फिल्ड मेटिओर ३५० जे सिरीज इंजिन मिळणारी पहिली बाईक आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये या बाईकच्या १० हजार ८४० युनिटची विक्री झाली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ६ हजार १८४ युनिटची विक्री झाली होती. विक्रीत यंदा ७५ टक्क्यांची वाढ दिसून येते. या बाईक्सना ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे.
- रॉयल इन्फिल्ड हंटर
Royal Enfield Hunter ही सर्वाधिक विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. काही महिन्यांपूर्वीच ही बाईक लाँच झाली होती आणि त्यानंतर तिच्या विक्रीला चांगलाच वेग आला. हंटर ही डिजाईनच्या बाबतीत इतर रॉयल इन्फिल्ड बाईक्सपेक्षा वेगळी आहे. तिच्या डिजाईनमध्ये आधुनिकता दिसून येते. सप्टेंबर २०२२ मध्ये या बाईकच्या १७ हजार ११८ युनिटची विक्री झाली. नवीनच लाँच झालेल्या बाईकसाठी हे मोठे यश आहे.
(टाटाने पंचमधून ‘हे’ महत्वाचे फीचर हटवले, इंधन बचतीवर होणार परिणाम)
- रॉयल इन्फिल्ड क्लासिक ३५०
सर्वाधिक विक्रीच्या बाबतीत प्रथम स्थान Royal Enfield Classic 350 ने पटकवले आहे. नव्या मॉडेल्समध्ये कंपनीचे नवीन जे सिरिज इंजिन मिळत आहे. इंजिन इंधनाचा योग्य वापर करून चांगली कामगिरी देते. सप्टेंबर महिन्यात या बाईकच्या २७ हजार ५७१ युनिटची विक्री झाली आहे. २०२१ मध्ये सप्टेंबर महिन्यात १३ हजार ७५१ युनिटची विक्री झाली होती. यावर्षी विक्री १०१ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.