Royal Enfield Classic 350 १२ ऑगस्टला लाँच होणार आहे. कंपनीने जूनमध्ये मॉडेलच्या 24,803 युनिट्सची विक्री केली आणि आता या मॉडेलचा अपडेटेड भाग येत आहे आणि यात थोडे बदल आणि नवीन फीचर्स असणार आहेत. तसेच याच्या लूक्समध्ये ट्विस्ट असणार आहे. चला तर मग नवीन Classic 350 बद्दल सर्व काही जाणून घ्या.

डिझाइन (Royal Enfield Classic 350 Design)

२०२४ ची Royal Enfield Classic 350 त्यांची मॉडर्न-क्लासिक स्टाईलिंग जपणार आहे. या डिझाइनला एक ओल्ड-स्कूल वाईब आहे, टीयरड्रॉप इंधन टाकीसह, गोल हेडलॅम्प आणि लांब, वक्र फेंडरदेखील आहे. नवीन कलर स्कीम्सदेखील (रंग) या मॉडेलमध्ये पाहायला मिळणार आहे.

ketu nakshatra parivartan 2024
१० नोव्हेंबरपासून ‘या’ ३ राशी कमावणार नुसता पैसा; केतूचे नक्षत्र परिवर्तन २०२५ पर्यंत करणार मालामाल
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Horror Movies On OTT (1)
हॉरर चित्रपट पाहायला आवडतात? OTT वरील ‘हे’ भयपट पाहताना फुटेल घाम, भयंकर आहेत कथा
Bhau Beej 2024 Date Time Shubh Muhurat Rituals in Marathi
Bhau Beej 2024 Date Shubha Muhurat: २ की ३ नोव्हेंबर, केव्हा साजरी केली जाणार भाऊबीज? जाणून घ्या तिथी, महत्त्व आणि भावाचे औक्षण करण्याची योग्य वेळ
Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश
Psychological Thriller Films On Hotstar
‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी
2nd november 2024 rashi bhavishya
२ नोव्हेंबर पंचांग: पाडव्याला नात्यात येईल गोडवा तर व्यवसायात होईल फायदा; तुमच्या नशिबात कोणत्या प्रकारात येईल सुख? वाचा राशिभविष्य
youth crowd at mankoli bridge to burst crackers
डोंबिवलीतील माणकोली पुलावर दिवाळीचा आखाडा; फटाके फोडण्यासाठी तरूणाईची गर्दी

हेही वाचा… Tata Punch Discount: टाटा पंचवर आता मोठी सवलत! ऑगस्टच्या महिन्यात मिळेल ‘इतक्या’ हजारांची सूट

फीचर्स (Royal Enfield Classic 350 Features)

अपडेटेड Royal Enfield Classic 350 मध्ये हेडलाईटसाठी, पायलेट लॅम्प्स, इंडिकेटर्स आणि टेल लाईटसाठी एल ई डी (LED) लाइट असणार आहे. Super Meteor 650 प्रमाणेच याला अ‍ॅडजस्टेबल ब्रेक आणि क्लच लिवर्स असणार आहेत. तथापि, ही वैशिष्ट्ये हायर-स्पेसिफिकेशन वेरियंट्समध्ये उपलब्ध असणार आहेत.

तपशील (Royal Enfield Classic 350 Specifications)

Royal Enfield 349cc, एअर/ऑइल-कूल्ड मोटरमध्ये कोणतेही यांत्रिक बदल करेल अशी अपेक्षा नाही. J-सीरिज इंजिन 20.2bhp आणि 27Nm ही पॉवर तयार करत राहील आणि ही पॉवर पाच-स्पीड गिअर बॉक्सशी लिंक असेल. Royal Enfield एका नवीन ‘प्रोजेक्ट J2’ वर काम करत आहे, ज्यात न्यू जनरेशनच्या Royal Enfield 350 मॉडेल्सवर अनेक अपग्रेड्स मिळणार आहेत.

हेही वाचा… Electric Car घ्यायचीय? थोडं थांबा, भारतात लाँच होतायत ५ नवीन इलेक्ट्रिक कार, मिळणार Advance फिचर्स अन् बरंच काही!

सायकल पार्ट्स (Royal Enfield Classic 350 Cycle parts)

२०२४ च्या Classic 350 मध्ये सायकल पार्ट्स तसेच राहणार आहेत. टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ड्युअर स्प्रिंग्स निलंबित केले जाईल. ब्रेकिंग सेटअप आणि चाकेदेखील तशीच राहतील. सध्याच्या मॉडेलप्रमाणेच रॉयल एनफिल्ड विशिष्ट प्रकारांमध्ये अलॉय व्हील ऑफर करत राहील.

किंमत (Royal Enfield Classic 350 Price)

नवीन वैशिष्ट्यांसह, आम्ही नवीन मॉडेलच्या किमतीत किरकोळ वाढीची अपेक्षा करतो. सध्या भारतात Royal Enfield Classic 350 ची किंमत रु. 1.95 लाख आणि रु. 2.30 लाख (एक्स-शोरूम) च्या मध्ये आहे.