Royal Enfield Classic 350 launched: Royal Enfield लव्हर्ससाठी आनंदाची बातमी आहे. तरुणांची आवडती बाईक Royal Enfield Classic 350 आता नव्या रुपात बाईक लव्हर्सच्या भेटीला आली आहे. रिच लूक, फीचर्स अशा अनेक गोष्टींमुळे कायम चर्चेत असणाऱ्या रॉयल एनफिल्डच्या Classic 350 या मॉडेलचं अपडेटेड व्हर्जन आलं आहे. जाणून घ्या याची किंमत, व्हेरियंट, रंग, फिचर्स आणि बरंच काही…

रॉयल एनफिल्डने आपली सर्वाधिक विकली जाणारी मोटरसायकल Classic 350 नव्या व्हेरियंटसह आता लाँच केली आहे, ज्याची किंमत १,९९,५०० रुपये आहे. या बाईकची बुकिंग सुरू झाली आहे आणि याची टेस्ट राइड आजपासून म्हणजेच १ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.

Upcoming Cars in September 2024
सप्टेंबरमध्ये मोठा धमाका! ग्राहकांनो, बाजारपेठेत दाखल होणार ‘या’ ५ नव्या कार; एकदा यादी पाहाच, टाटाचाही समावेश
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Royal Enfield Classic 350 vs Jawa 350 Bringing retro back
नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० विरुद्ध जावा ३५०; कोणती सर्वात जबरदस्त?
Maruti Suzuki Alto and S-Presso price dropped get dropped in this festival offer
सणासुदीत स्वस्तात कार घ्यायचीय? Maruti Suzukiच्या ‘या’ गाड्या झाल्या स्वस्त, किंमत वाचून व्हाल थक्क
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

रॉयल एनफिल्डचे व्हेरियंट (Royal Enfield Classic 350 Variants)

Classic 350 एकूण ५ व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे- हेरिटेज (Heritage), हेरिटेज प्रीमियम (Heritage Premium), सिग्नल्स (Signals), डार्क (Dark) आणि क्रोम (Chrome). या नवीन व्हेरियंटसह २०२४ च्या Classic 350 मध्ये नवीन फीचर्सदेखील आहेत. रॉयल एनफिल्डने १२ ऑगस्ट रोजी Classic 350 च्या अपडेटबद्दल सांगितलं होतं; परंतु आतापर्यंत किमती उघड केल्या नव्हत्या.

हेही वाचा… अखेर प्रतिक्षा संपली! तरुणांची आवडती बाईक ‘या’ दिवशी होणार लाँच; फीचर्स अन् डिझाईन पाहून प्रेमात पडाल

रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५०ची किंमत (Royal Enfield Classic 350 Price)

Classic 350 ची किंमत रु. १,९९,५०० पासून सुरू होते, ज्यामुळे ही नवी-कोरी एंट्री-लेव्हल हेरिटेज व्हेरिएंट मागील मॉडेलच्या Redditch Red आणि Redditch Grey व्हर्जनपेक्षा ६,४२० रुपये अधिक महाग आहे.

2024 Classic 350किंमतOld Classic 350किंमत
हेरिटेज (Heritage)Rs 1,99,500Redditch Red and Redditch Grey
Rs 1,93,080
हेरिटेज प्रीमियम (Heritage Premium)Rs 2,04,000Halcyon Black and Halcyon Green (single-channel ABS)Rs 1,95,919
सिग्नल्स (Signals)Rs 2,16,000Halcyon Black and Halcyon Green (dual-channel ABS)Rs 2,02,094
डार्क (Dark)Rs 2,25,00Signals Desert Sand and Signals Marsh GreyRs 2,13,852
क्रोम (Chrome)Rs 2,30,000Dark Stealth Black and Gunmetal GreyRs 2,20,991
Chrome Bronze and Chrome RedRs 2,24,755

क्लासिक ३५०चे रंग (Classic 350 Colors)

व्हेरियंट (Variants)रंग (Colors)
हेरिटेज (Heritage)मद्रास रेड आणि जोधपूर ब्लू
हेरिटेज प्रीमियम (Heritage Premium)मेडलियन ब्राँझ
सिग्नल्स (Signals)कमांडो सॅंड
डार्क (Dark)गन ग्रे आणि स्टेल्थ ब्लॅक
क्रोम (Chrome)एमराल्ड ग्रीन

Royal Enfield Classic 350 : नवीन फीचर्स (Royal Enfield Classic 350 New Features)

Classic 350 मॉडर्न फीचर्ससह त्याच्या वर्षानुवर्षे असलेल्या रेट्रो थिमवर कायम आहे. रॉयल एनफिल्ड ३५० सीसी आता एलईडी हेडलाइट, LED पायलट लॅंप्स, गियर पोझिशन इंडिकेटर, अपग्रेड केलेल्या टाइप-सी चार्जिंग पोर्टसह सुसज्ज आहे. प्रीमियम डार्क आणि एमराल्ड (क्रोम) व्हेरियंटमध्ये ट्रिपर नेव्हिगेशन पॉड, ॲडजस्टेबल क्लच आणि ब्रेक लीव्हर्स आणि एलईडी इंडिकेटर यांसारखी एक्स्ट्रा स्टॅंडर्ड फीचर्स आहेत.

Royal Enfield Classic 350: स्पेसिफिकेशन (Specification)

Classic 350 मध्ये 6100 rpm वर 20.2 bhp आणि 4000 rpm वर 27 Nm आउटपूटसह 349 cc J सीरिजचं एअर-ऑइल कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. तसंच Classic 350 5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेली आहे. यात सीटची उंची 805 मिमी, ग्राउंड क्लीयरन्स 170 मिमी आणि 13-लिटरची इंधन टाकी आहे. Classic 350 Jawa 350 आणि Honda CB350 शी स्पर्धा करेल.