टू व्हीलर सेक्टरमधील क्रूझर बाइक सेगमेंटमध्ये निवडक बाइक्स आहेत. मायलेजसह बजेट बाइक्सना सर्वाधिक मागणी आहे. तुम्हालाही क्रूझर बाइक घ्यायची असेल, तर आम्ही येथे दोन लोकप्रिय क्रूझरची संपूर्ण माहिती देत ​​आहोत. आज आमच्याकडे रॉयल एनफिल्ड Classic 350 आणि Honda Hannes 350 आहेत या दोन बाइक आहेत. ज्यामध्ये आम्ही या दोघांची किंमत ते स्पेसिफिकेशनपर्यंत संपूर्ण माहिती देणार आहोत.

Royal Enfield Classic 350: रॉयल एनफिल्ड Classic 350 ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. कंपनीने पाच प्रकारांसह बाजारात लॉन्च केली आहे. या बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर कंपनीने ३४९.३४ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे, जे एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन २०.२१ पीएस पॉवर आणि २७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने बाईकच्या पुढच्या आणि मागील चाकांमध्ये डिस्क ब्रेक दिले आहेत. यात ड्युअल एबीएल चॅनल देण्यात आले आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही बाईक ४१.५५ किमीचा मायलेज देते आणि ARAI द्वारे प्रमाणित आहे. रॉयल एनफिल्ड Classic 350 ची सुरुवातीची किंमत १.८४ लाख रुपये आहे. टॉप व्हेरियंटवर जाताना २.१५ लाखांपर्यंत जाते.

Photo: Mercedes-Benz ची Vision EQXX इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जवर धावणार १००० किमी

Honda Hness CB350: ही बाइकरेट्रो-डिझाइन केलेली क्रूझर बाइक आहे. कंपनीने तीन प्रकारांसह लॉन्च केली आहे. या बाईकच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर यात ३४८.३६ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन असून फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन २१.०७ पीएस पॉवर आणि ३० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने त्याच्या पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे, ज्यामध्ये ड्युअल चॅनल एबीएस सिस्टम देण्यात आली आहे. बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, गाडी ४५.८ किमीचा मायलेज देते आणि हा मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे. Honda Hness CB 350 ची सुरुवातीची किंमत १.९४ लाख रुपये असून टॉप व्हेरियंटवर जाताना २.०३ लाखांपर्यंत जाते.

Story img Loader