क्रूझर बाईक सेगमेंट हा टू व्हीलर सेक्टरचा एक प्रीमियम सेगमेंट आहे. या दुचाकीला साहसी आणि लांब प्रवास करणारे उत्साही लोक पसंत करतात. जर तुम्हाला क्रूझर बाइक्सही आवडत असतील आणि तुम्हाला मजबूत आणि स्टायलिश क्रूझर बाइक घ्यायची असेल, तर तुम्ही या विभागातील दोन लोकप्रिय बाइक्सची संपूर्ण माहिती जाणून घ्या. तुलनेसाठी आमच्याकडे Royal Enfield Classic 350 आणि Jawa बाईक आहेत. या दोन्ही बाइकच्या किमतीपासून संपूर्ण तपशील जाणून घेता येतील.

Royal Enfield Classic 350: रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० बाइक कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी क्रूझर बाईक आहे. ही बाइक पाच प्रकारांसह बाजारात दाखल झाली आहे. बाइकला ३४९.३४ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले असून एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन २०.२१ पीएस पॉवर आणि २७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. तसेच ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्याच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेकचे संयोजन दिले आहे. यामध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम जोडले गेले आहे. बाइकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही बाइक ४१.५५ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हा मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे. रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० ची सुरुवातीची किंमत १.८७ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. टॉप व्हेरियंटवर २.१८ लाखांपर्यंत जाते.

New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune officers without helmet no entry
पुणे: सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!
Bike caught a fire alive man burnt in fire viral video on social media
VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप
Raigad Chi Waghin | Viral Video
VIDEO : रायगडची वाघीन! शिवप्रेमीची दुचाकी एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी
table no 21 joker blind psycholigical thrillers on ott
‘मर्डर २’ पाहिलाय? त्याहूनही भयानक आहेत जिओ सिनेमावरील ‘हे’ सायकॉलिजल थ्रिलर चित्रपट; पाहा यादी

Flying Saucer: ऑटो क्षेत्रात आणखी एक क्रांती, ऑक्टोकॉप्टरचं यशस्वी उड्डाण

Jawa: जावा या सेगमेंटमधील एक दमदार बाइक असून याचे दोन प्रकार कंपनीने बाजारात लाँच केले आहेत. बाइकमध्ये सिंगल सिलेंडर २९३ सीसी इंजिन आहे. जे एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन २७.३३ पीएस पॉवर आणि २७.०२ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. जे ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने त्याच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक लावले आहेत. यात ड्युअल चॅनल एबीएस सिस्टम देण्यात आले आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, जावा बाइक ३७.५ किमीचा मायलेज देते. हा मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. जावाची सुरुवातीची किंमत १.७८ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्याच्या टॉप व्हेरियंटवर जाते तेव्हा ती १.८७ लाखांपर्यंत जाते.