Royal Enfield’s First Electric Bike: देशातील इलेक्ट्रिक वाहनांबाबत ऑटो कंपन्या बऱ्यापैकी गंभीर असल्याचे दिसत आहे. सध्या बजाज ऑटो, टीव्हीएस आणि हिरो मोटोकॉर्प सारख्या मोठ्या दुचाकी कंपन्यांकडे प्रत्येकी एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे. आता रॉयल एनफिल्ड देखील यात सामील झाली आहे. रॉयल एनफिल्डनंही इलेक्ट्रीक वाहनांच्या यादीत ग्रँड एन्ट्री घेतली आहे. होय, रॉयल एनफिल्डने त्याच्या नवीन सब-ब्रँड फ्लाइंग फ्लीद्वारे इलेक्ट्रिक बाईकच्या सेगमेंटमध्ये शानदार प्रवेश केला आहे. Royal Enfield ने इटलीच्या मिलान शहरात आयोजित EICMA 2024 इंटरनॅशनल मोटर शोमध्ये फ्लाइंग फ्ली या नवीन EV ब्रँडची घोषणा केली आहे.

लोक रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक बाईकची खूप दिवसांपासून वाट पाहत होते आणि मिलानमध्ये ICMA 2024 सुरू झाल्यामुळे जगभरातील लोकांना फ्लाइंग फ्ली C6 दिसली. ही बाईक रेट्रो लुक आणि आधुनिक वैशिष्ट्यांचा कॉम्बो म्हणून आली असून रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रीकचा लूक इतका अप्रतिम आहे की त्यावरुन तुमची नजर हटणार नाही.

women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Skoda Kylaq SUV launched In India
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
New Maruti Suzuki Dzire earns 5-star rating in Global NCAP safety test Delivers 25.71 Kmpl 2024 Maruti Dzire features and engine
New Maruti Suzuki Dzire: मारुतीने केली सगळ्यांची बोलती बंद! लॉंच होण्यापूर्वीच डिझायरला मिळालं ५-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग
Sharad Pawar Ajit Pawar fb
Ajit Pawar : “शरद पवार राजकारणातून बाजूला झाल्यानंतर हा पठ्ठ्या…”, अजित पवारांचं सूचक वक्तव्य
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

एनफिल्डच्या या इलेक्ट्रीक व्हीकलच्या सब्सिडियरीच्या नावाची प्रेरणा 40 च्या दशकात सादर करण्यात आलेल्या फ्लाईंग फ्ली या जुन्या मॉडेलपासून घेम्यात आली आहे. एनफिल्डच्या इतर बाईकपेक्षा या इलेक्ट्रीक बाईकला पूर्ण नवा लूक देण्यात आला आहे. स्टायलिंगमध्ये ही बाईक रेट्रो दिसत असली तरीही कंपनीनं तिला अतिशय आधुनिक रुपात सादर केलं आहे. या बाईकचा लूक लो स्लंग बॉबर मोटरसायकलसारखा असून, त्यामध्ये रेक आऊट फ्रंट , सोलो सॅडल देण्यात आला आहे.

फीचर्सही जबरदस्त

Royal Enfield Flying Flea C6 च्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, यात राउंड शेपचा टचस्क्रीन TFT डिस्प्ले तसेच इन-हाउस बिल्ड सॉफ्टवेअर आहे, जे हवेवर अपडेट केले जाऊ शकते. याशिवाय, यात कॉर्नरिंग एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, वाहन नियंत्रण युनिटमध्ये 2000 हून अधिक राइड मोड कॉम्बिनेशनसह इतर अनेक फीचर प्रदान करण्यात आली आहेत. रॉयल एनफिल्डचा दावा आहे की, फ्लाइंग फ्ली सी6 इलेक्ट्रिक मोटरसायकल चालवणे खूप सोपे आहे. या सगळ्या दरम्यान, आम्ही तुम्हाला सांगतो की, येत्या काळात, Royal Enfield च्या सब-ब्रँड Flying Flea ची पुढील इलेक्ट्रिक मोटरसायकल S6 देखील लाँच केली जाईल, जी Scrambler सेगमेंटमध्ये असेल.

हेही वाचा >> New Maruti Suzuki Dzire: मारुतीने केली सगळ्यांची बोलती बंद! लॉंच होण्यापूर्वीच डिझायरला मिळालं ५-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग

किंमत काय ?

या बाईकची किंमत अद्याप समोर आलेली नाही, पण तिचा लूक मात्र बाईकप्रेमींच्या मनात घर करताना दिसत आहे हे खरं.