गोअन क्लासिक ३५० ही रॉयल एनफिल्डच्या ३५०cc रेंजमध्ये नवीन मॉडेलचे २३ नोव्हेंबरलागोव्यातील वार्षिक मोटोवर्स इव्हेंटमध्ये अधिकृत अनावरण होणार आहे. आहे. यात बुलेट, मिटीओर, हंटर आणि क्लासिक या आधीच लोकप्रिय असलेल्या मॉडेल्सचा समावेश आहे. रॉयल एनफिल्ड आपल्यासाठी नवी गोअन क्लासिक ३५० घेऊन येत आहे, जी चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. चला, या बाईकसाठी उपलब्ध असलेल्या रंगांच्या पर्यायांवर एक नजर टाकूया.

गोअन क्लासिक ३५०: कलर ऑप्शन्स (Goan Classic 350 Color Options)

रॉयल एनफिल्डने गोअन क्लासिक ३५० च्या चार पेंट स्कीम्स लाँचपूर्वीच लॉन्च केल्या आहेत. या रंगांच्या पर्यायांमुळे तुमचा प्रवास केवळ स्टायलिशच नव्हे तर गोव्याच्या उत्साही वातावरणाशी सुसंगत असेल.

Kalgitura play selected at Bharangam International Festival in New Delhi
दिल्लीतील भारंगम आंतरराष्ट्रीय महोत्सवात नाशिकचा ‘कलगीतुरा’
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित

Royal Enfield Goan Classic 350: रेव्ह रेड (Rave Red)

Image: Royal Enfield
Image: Royal Enfield

या बाईकमध्ये ड्युअल टोन रेड आणि ब्लॅक या दोन रंगांचा कॉम्बिनेशन आहे. रॉयल एनफिल्डने याला ‘रेव्ह रेड’ असे नाव दिले आहे. हेडलॅम्प, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि फ्रंट फोर्क्स ब्लॅक कलरमध्ये असून त्याला क्रोम फिनिश दिला आहे. फ्यूल टँकवर रेड पेंट आहे, तर फेंडर्सवर लाल पट्टे आहेत. रेड अॅनोडाइज्ड रिम्स ही या मॉडेलची खासियत आहे. चाकांना तरूण लाल एनोडाइज्ड रिम्सने सजवले आहेत. फ्यूल टँकवर खास क्रोम सन बॅज आहे जो गोव्याच्या सूर्य आणि समुद्रकिनाऱ्यांवरून प्रेरित आहे. रेव्ह रेड स्लॅश-कट एक्झॉस्ट पाईप पूर्ण काळ्या रंगाचा आहे.

हेही वाचा –Activa Electric: इलेक्ट्रिक स्कूटर घेत आहात? होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; जाणून घ्या काय असेल किंमत

y

ट्रिप टील (Trip Teal)

Image: Royal Enfield
Image: Royal Enfield

रॉयल एनफिल्ड क्लासिकच्या इतिहासात टील कलरला विशेष स्थान आहे कारण2009 मध्ये लाँच केल्यावर त्याच पेंट स्कीममध्ये मूळ आवृत्ती सादर केली गेली होती. रॉयल एनफिल्ड आता ट्रिप टील रंग गोव्यात ड्युअल-टोन पेंट म्हणून ऑफर करत आहे.
नवीन गोअन क्लासिक 3३५० मध्ये याच रंगाला ऑरेंज अॅक्सेंटच्या नव्या ट्विस्टसह परत आणले आहे.. फ्यूल टँक, फेंडर्स, आणि व्हील रिम्सवर ऑरेंज कलरची हळुवार झलक आहे, जी गोव्याच्या आनंददायी आणि उत्साही वातावरणाला दर्शवते. फेंडर, इंधन टाकी आणि क्रॉस-स्पोक्ड चाकांच्या रिम्सवर ऑरेंज स्प्लॅश दिसतात. ट्रिप टील ऑल-क्रोम एक्झॉस्टसह आयकॉनिक रेट्रो मोटरसायकलच्या आठवणींना उजाळा देते.

हेही वाचा – Jaguar new logo: जग्वारने १०२ वर्षांनंतर लाँच केला नवीन लोगो; आधीच्या आणि आत्ताच्या लोगोमध्ये काय बदल?, जाणून घ्या

शॅक ब्लॅक (Shack Black)

Image: Royal Enfield
Image: Royal Enfield

गोआन क्लासिक 350 चे शॅक ब्लॅक व्हेरियंट हे Raw अॅटिट्युड दर्शवणारे आणि रस्त्यावर लक्ष वेधून घेणारे आहे, कमीतकमी डिझाइनसह जे व्हॉल्यूम देते. ब्लॅक कलरचा कधीही न संपणारा आकर्षण असलेल्या शॅक ब्लॅक व्हेरिएंटमध्ये मॅट फिनिश आहे. फक्त फ्यूल टँक आणि साइड पॅनेल्सवर गुळगुळीत ब्लॅक ग्राफिक्स आहेत. सोनेरी रंगातील “सूर्य बॅज” या मॉडेलला अनोखी ओळख देतो. या बाईकचा संपूर्ण डिझाइन मिनिमल असून ती स्टायलिश आणि दमदार लूक देते. रॉयल एनफिल्ड या रंगसंगतीसह ते कूल (Cool) अॅटिट्यूड आणि साधेपणा कायम ठेवते, एक्झॉस्ट पाईप, फेंडर आणि व्हील रिम्स एका शार्प लूकसाठी सर्व-काळ्या असतात.

पर्पल हेज (Purple Haze)

Image: Royal Enfield
Image: Royal Enfield

जर शॅक ब्लॅकला “डार्क नाईट” आवडेल, तर पर्पल हेज “घोस्ट रायडर”साठी परफेक्ट ठरेल. फक्त फ्यूल टँकवर असलेल्या या पर्पल कँडी फिनिशने बाईकला खास ग्लॅमर दिले आहे. फ्यूल टँकवर “Royal Enfield” पांढऱ्या रंगात तर “Goan” ब्लॅकमध्ये लिहिलेले आहे. संपूर्ण बाईकवर ब्लॅक थीम आहे, ज्यात फेंडर्स, साइड पॅनेल्स आणि व्हील रिम्स ब्लॅक कलरचे आहेत.

२३ नोव्हेंबर रोजी या बाईकच्या किमतीचेही अनावरण होणार आहे. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारा रंग निवडा आणि रॉयल एनफिल्ड गोअन क्लासिक ३५०च्या स्टायलिश राइडसाठी सज्ज व्हा.

Story img Loader