Royal Enfield Goan Classic 350 : रॉयल एनफील्ड ही भारतातील एक लोकप्रिय दुचाकी आहे. तरुणाईमध्ये या दुचाकीची सर्वात जास्त क्रेझ आहे. आता लवकरच मार्केटमध्ये रॉयल एनफील्ड क्लासिक 350 चं नवी मॉडेल येत आहे जी रॉयल एनफील्ड क्लासिक 350 बॉबर म्हणून ओळखली जाईल.
असं म्हणताहेत की कार कंपनीचे निर्माता लवकरच येत्या मोटोवर्स इव्हेंटमध्ये या दुचाकीला लाँच करू शकतात. तीन दिवसाचा हा इव्हेंट नोव्हेंबरमध्ये गोवा येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या नव्या दुचाकीचे नाव गोवा क्लासिक 350 असू शकते पण याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. क्लासिक 350 बॉबरचे डिझाइन, इंजिन आणि फीचर्सविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
Royal Enfield Goan Classic 350 Bobber: डिझाइन
क्लासिक 350चा नवा बॉबर व्हर्जन आपल्या सिग्नेचर रेट्रो डिझाइनप्रमाणे असणार पण यामध्ये अपडेट केलेले पार्ट आणि कंपोनेंट असणार. रॉयल एनफील्डमध्ये सिंगल सिट आणि स्प्लिट सीट सह अन्य काही सीटिंग पर्याय असणार.
काही समोर आलेल्या फोटोनुसार, स्प्लिच सीटमध्ये स्कूप्ड फ्रंड आहे जो पाठीमागील भागास आरामदायी सपोर्ट देतो. आणि शॉटगन 650 प्रमाणे डिटॅचेबल पिलियन सीटबरोबर येतो. बॉबर असल्यामुळे नव्या गोअन क्लासिक 350 मध्ये अप हँगर यू-आकाराचा हँडलबार सुद्धा आहे.
रॉयल एनफील्डने नवीन रुंद आणि लहान फेंडर्स तसेच खुल्या रियर व्हीलसह रेट्रो डिझाइनला आणखी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये क्रोम रिंग आणि मेटल हेडलाइट कॅपसह पारंपारिक गोल हेडलँप आहे. यामध्ये टायगर आय पायलट लँप सुद्धा आहे. रॉयल एनफील्ड बॉबरमध्ये अपडेटेड क्लासिक प्रमाणे सर्व एलईडी लाइट्स असू शकतात आणि टॉप मॉडेल प्रमाणे एलईडी इंडिकेटर सुद्धा असू शकतात.
Royal Enfield Goan Classic 350 Bobber: इंजिन आणि फीचर्स
गोअन क्लासिक 350 मध्ये २३९cc चा j-सीरीज इंजिन लावला आहे जो २०.२ bhp आणि २७ Nm चा टॉर्क प्रदान करतो. यामध्ये ५-स्पीड गिअरबॉक्स आहे. बॉबर मध्ये 350cc लाइनअपची दूसरी मोटरसाइकलचे पार्ट्सचा समावेश आहे ज्यामध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, डुअल रिअर शॉक्स, ३०० mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि २७० mm रिअर डिस्क ब्रेकचा समावेश आहे अतिरिक्त सुरक्षेसाठी हा डुअल-चॅनल ABS सह येतो.
अपडेटेड क्लासिक 350 च्या प्रमाणे गोअन क्लासिक 350 मध्ये एडजस्टेबल ब्रेक आणि क्लच लीवर असू शकतात. याच्या इंस्ट्रूमेंट कंसोल मध्ये एनालॉग स्पीडोमीटर, LCD मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले आणि टॉप मॉडल साठी ट्रिपर नेविगेशन पॉडचा समावेश आहे. याशिवाय या USB चार्जिंग पोर्टसुद्धा असणार.