Royal Enfield Bike Waiting Period: अलीकडेच, रॉयल एनफिल्डने आपली शक्तिशाली बाईक Guerrilla 450 भारतात सादर केली आहे. ही बाईक बाजारात दाखल होताच लोकांना आकर्षित करू लागली आहे. बाजारपेठेत या बाईकची मागणी वाढताना दिसून येत आहे. बाईकचे बुकिंग आधीच सुरू झाले असून ग्राहक १० हजार रुपये टोकन रक्कम देऊन डीलर्सना भेट देऊन या बाईकचे बुकींग करू शकतात. पण बुकिंग करण्यापूर्वी तुमच्यासाठी नवीन Guerrilla 450 ची सध्या किती प्रतीक्षा कालावधी आहे, ते जाणून घ्या…
Royal Enfield Guerrilla 450 प्रतीक्षा कालावधी
रिपोर्ट्सनुसार, आज तुम्ही नवीन Guerrilla 450 बुक केल्यास, तुम्हाला या बाईकच्या डिलिव्हरीसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागेल. जर तुम्ही ही बाईक आज पुण्यात बुक केली तर तुम्हाला तिच्या डिलिव्हरीसाठी २० दिवस वाट पाहावी लागेल. याशिवाय मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई शहरात या बाईकसाठी ४५ दिवसांचा प्रतीक्षा कालावधी आहे. एवढेच नाही तर दिल्लीत या बाईकच्या डिलिव्हरीसाठी तुम्हाला ५० दिवस वाट पाहावी लागणार आहे. चला जाणून घेऊया बाईकची वैशिष्ट्ये …
(हे ही वाचा : बाकी कंपन्यांची उडाली झोप, टाटाची नवी SUV येतेय बाजारात, पेट्रोल, डिझेल अन् इलेक्ट्रिक पर्यायात उपलब्ध, ‘इतकी’ मिळेल रेंज )
डिझाइन, वैशिष्ट्ये आणि रंग पर्याय
नवीन Royal Enfield Guerrilla 450 ची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की तुम्ही ते दैनंदिन वापरासाठी सहजपणे लांब अंतरापर्यंत नेऊ शकता. या बाईकचे वजन १८५ किलो आहे. यात १७ इंच टायर आहेत जे रस्त्यावर तसेच ऑफ रोडवर चांगली कामगिरी देऊ शकतात. बाईकमध्ये लावलेल्या गोल एलईडी हेडलाइटमुळे ती खूपच क्लासिक दिसते. या बाईकमध्ये TFT डिजिटल स्पीडोमीटर आहे, त्यात नेव्हिगेशन फीचर देखील उपलब्ध आहे. त्याच्या कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ फीचर देण्यात आले आहे. मीटरमध्ये गीअर शिफ्ट इंडिकेटरचीही सुविधा आहे. यात ११ लीटरची पेट्रोल टाकी आहे. यात लांब सिंगल सीट आहे.
उत्तम सुरक्षा वैशिष्ट्ये
या बाईकमध्ये ड्युअल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टमसह EBD ची सुविधा आहे. याच्या पुढील चाकामध्ये ३३१०mm हायड्रॉलिक डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस २७०mm व्हेंटिलेटेड डिस्क ब्रेक आहे. तुम्ही अचानक ब्रेक लावल्यास ही बाईक घसरणार नाही किंवा पडणार नाही.सहा गिअरबॉक्सनं जोडण्यात आलेल्या या बाईकमध्ये असिस्ट आणि स्लिप क्लच उपलब्ध आहे.
गुरिल्ला 450 ट्विन स्पार ट्यूबलर फ्रेममध्ये आहे आणि त्याचा व्हीलबेस १,४४० मिमी आहे. २,०९० मिमी, रुंदी ८३३ मिमी आणि उंची १,१२५ मिमी आहे. ग्राउंड क्लीयरन्स १७५ मिमी आणि सीटची ग्राउंड ८०० मिमी आहे. या बाईकसाठी भारतात २.३९ लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी किंमत मोजावी लागणार आहे.