Royal Enfield Bikes:  रॉयल एनफिल्डचे भारतीय मोटरसायकल मार्केटमध्ये 350cc सेगमेंटमध्ये वर्चस्व कायम आहे. गेल्या महिन्यात 350cc मोटरसायकल सेगमेंटमध्ये सकारात्मक वाढ झाली आहे. जानेवारी २०२३ मध्ये ३५.५३ टक्के वाढीसह ६८,८८० युनिट्सची विक्री झाली आहे. या यादीतील टॉप ५ मॉडेल्स एकट्या रॉयल एनफिल्डची आहेत. कंपनीची क्लासिक 350 ही सेगमेंट आणि कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. रॉयल एनफिल्डच्या दीड लाखांच्या बाईकने बुलेटसह बाकीच्या बाईकलाही मागे टाकले आहे. ही कंपनीची Royal Enfield Hunter 350 बाईक आहे, जी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीड लाखाच्या बाईकने केला कमाल

टॉप ५ मॉडेल्सच्या यादीमध्ये, रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ची जानेवारी २०२३ मध्ये सर्वाधिक विक्री झाली. गेल्या महिन्यात या बाईकची २६,१३४ युनिट्सची विक्री झाली आहे, जी जानेवारी २०२२ मध्ये विकल्या गेलेल्या २६,७७५ युनिटच्या तुलनेत २.३९ टक्क्यांनी कमी आहे. एकट्या क्लासिक 350 चा 350cc सेगमेंटमध्ये ३७.९४ टक्के मार्केट शेअर होता. दुसऱ्या क्रमांकावर, हंटर 350 ने जानेवारी २०२३ मध्ये १६,५७४ युनिट्स विकल्या. डिसेंबर २०२२ मध्ये विक्री झालेल्या १७,२६१ युनिटच्या तुलनेत विक्रीत मासिक ३.९८ टक्क्यांची घट झाली. त्याचा बाजार हिस्सा २४.०६ टक्के आहे.

(हे ही वाचा : Maruti Suzuki Discounts: अल्टो ते वॅगनआरसह मारुतीच्या ‘या’ कार स्वस्तात खरेदी करा, मिळतोय तगडा डिस्काउंट )

विशेष म्हणजे, ही बाईक फार कमी वेळात दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. अगदी बुलेट 350 आणि Meteor 350 सारख्या मोटारसायकलींना विक्रीत मागे टाकले आहे. बाईकची सुरुवातीची किंमत सुमारे १.५ लाख रुपये आहे. ही कंपनीची सर्वात हलकी बाईक आहे. त्याची रचना देखील अतिशय आकर्षक दिसते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Royal enfield has been the companys best selling bike in the classic 350 segment pdb