Royal Enfield Himalayan 750: रॉयल एनफील्ड कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सतत चर्चेत येत असते.रॉयल एनफील्डचा एक मोठा चाहतावर्ग दिसून येतो. लूक आणि फीचर्समुळे अनेक जण आवडीने ही दुचाकी खरेदी करतात. रॉयल एनफिल्ड अनेकदा तिचे अपडेटेड व्हर्जन बाजारात आणते. अशातच रॉयल एनफील्ड हिमालयन 750 ची बाईकची बऱ्याच दिवसांपासून ग्राहकांना प्रतिक्षा आहे अलीकडेच या बाईकची दक्षिण युरोपमध्ये टेस्टिंग करण्यात आली आहे. याच्या टेस्ट म्यूल इमेजेसमध्ये असे दिसते की, ही बाईक लवकरच इंडियन मार्केटमध्ये लाँच होईल.
नवीन हिमालयन 750 चे डिझाईन त्याच्या आधीच्या बाईक्सपेक्षा वेगळे असण्याची शक्यता आहे आणि त्यात अनेक नवीन अपडेट्स पाहायला मिळू शकता. यात 19-इंची फ्रंट आणि 17-इंची रिअर स्पोक व्हील सेटअप असेल जे एडजस्टेबल अपसाइड-डाउन फोर्क्स आणि ॲडजस्टेबल मोनोशॉकसह येईल. बाईकमध्ये ड्युअल फ्रंट डिस्क ब्रेक सेटअप देखील असेल, ज्यामध्ये Bybre कॅलिपर वापरण्यात आले आहेत.
हेही वाचा >> नाद करायचा नाय! ह्युंदाई क्रेटाची उडणार झोप; होंडा लाँच करणार नवीन एसयूव्ही, पाहा किंमत अन् जबरदस्त फिचर्स
सध्याचा पोर्टफोलिओ 350cc ते 650cc बाईक
कंपनी भविष्यात 350cc ते 750cc रेंजमध्ये अनेक बाईक लॉन्च करू शकते. कंपनीकडे सध्या 350cc ते 650cc पर्यंतच्या बाईक्सचा पोर्टफोलिओ आहे.
स्पेसिफिकेशन डिटेल्स
यात एक नवीन फ्रंट काउल आणि एक मोठी विंडस्क्रीन असेल. बाईकमध्ये मोठ्या TFT डिस्प्लेसह गीअर पोझिशन इंडिकेटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशन यांसारख्या फीचर्सचा समावेश असेल.
रॉयल एनफिल्ड २०२५ मध्ये करणार मोठा धमाका! लाँच करणार पॉवरफूल बाईक्स
बुलेट 650 ट्विन
Royal Enfield नवीन वर्षात नवीन Bullet 650 Twin लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही बाईक अनेकवेळा टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे. बुलेट 650 ची डिझाइन बुलेट 350 सारखेच असेल.
क्लासिक 650
रॉयल एनफील्ड यावर्षी आपली नवीन क्लासिक 650 इंडियन मार्केटमध्ये लाँच करेल. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर या बाईकमध्ये 648cc पॅरलल ट्विन इंजिन असेल जे 46.3bhp ची कमाल पॉवर आणि 52.3Nm टॉर्क जनरेट करू शकते. या बाईकची डिझाइन क्लासिक 350 सारखी असू शकते.