रॉयल एनफिल्डने नुकतंच Himalayan बाइकचं अपग्रेड केलेलं व्हर्जन लाँच केलं. कंपनीने हिमालयन बाईक पहिल्यांदा २०१६ मध्ये लॉन्च केली होती. आता रॉयल एनफिल्डने हिमालयन बाईक अपग्रेडसह पुन्हा लॉन्च केली आहे. यामध्ये ग्राहकांना पाइन ग्रीन, ग्रॅनाइट ब्लॅक आणि मिराज सिल्व्हर अशा रंगात मिळणार आहे. हिमालयन २०२१ च्या डिझाईनमध्ये तुम्हाला फारसे बदल दिसणार नाहीत, पण त्यात किंचित बदल करण्यात आले आहेत. नवीन हिमालयन बाईकमध्ये ट्रिपर नेव्हिगेशन फीचर जोडण्यात आले आहे. कंपनीने नुकत्याच लॉन्च केलेल्या त्यांच्या नवीन बाइक Meteor 350 मध्ये हे फीचर दिले होते. आता Meteor प्रमाणे, नवीन हिमालयन बाईक देखील एक लहान, गोलाकार रंगाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना नेव्हिगेशनचा पर्याय आहे. हे ब्लूटूथद्वारे कार्य करते. यासाठी वापरकर्त्यांना त्यांच्या फोनवर रॉयल एनफील्ड अॅप डाउनलोड करावे लागेल आणि ते ब्लूटूथद्वारे कनेक्ट करावे लागेल.

नवीन हिमालयन बाईकमध्ये तुम्हाला इंधन टाकी आणि विंडस्क्रीनमध्येही बदल दिसतील. त्याची विंडस्क्रीन पूर्वीपेक्षा मोठी करण्यात आली आहे. अधिक वेगाने असताना वापरकर्त्यांना वाऱ्यापासून संरक्षण मिळेल. याशिवाय इंधन टाकीही बदलण्यात आली आहे. इंधन टाकीचा रॅक आधीपेक्षा लहान करण्यात आला आहे. पूर्वी रायडर्सना इंधन टाकीची फ्रेम त्यांच्या गुडघ्यांना स्पर्श करत असल्याची समस्या होती. आता या बदलामुळे रायडरच्या गुडघ्याला इंधन टाकीला स्पर्श होणार नाही.या बाईकच्या अपग्रेडेड व्हर्जनमध्ये वापरकर्त्यांना लगेज कॅरिअर आणि सीटमधील बदल देखील पाहायला मिळतील. हिमालयनच्या मागील लगेज कॅरियरला नवीन मेटल प्लेटन लावण्यात आली आहे ज्यामुळे रायडर्स लाँग ड्राईव्हवर पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षितपणे जड सामान वाहून नेण्यास सक्षम होणार आहेत. यासोबतच सीटही बदलण्यात आली आहे. नवीन हिमालयन बाईकवरील सीट हाय-डेन्सिटी फोमची बनलेली आहे, ज्यामुळे राइडिंग आरामदायी होते आणि लांबच्या प्रवासात कोणतीही अडचण येत नाही.

नवीन हिमालयन बाईकमध्ये यांत्रिकरित्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही. उर्वरित फिचर पूर्वीप्रमाणेच आहेत. हिमालयन बाईकमध्ये ४११ सीसी सिंगल-सिलेंडर एअर कूल्ड मोटर आहे. त्याचे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात पूर्वीप्रमाणेच २२० मिमीचे सस्पेंशन आहे. दुसरीकडे, जर आपण नवीन हिमालयनच्या किंमतीबद्दल बोललो तर दहा हजारांनी अधिक महाग आहे. नवीन हिमालयनची किंमत २.०४ लाख रुपये आहे.

Story img Loader