रेट्रो बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफिल्ड आता त्यांच्या पुढील मोठ्या लॉंचची तयारी करत आहे. कंपनी आता जपानमध्ये सुद्धा रॉयल एनफिल्ड हिमालयन लॉंच करणार आहे. या बाईकबाबत सातत्याने बातम्या येत आहेत. या वर्षीच्या सुरूवातीलाच कंपनीने जपानची राजधानी टोकियो इथे पहिले स्टँड-अलोन, फ्लॅगशिप स्टोअर उघडले होते. रॉयल एनफिल्ड जपानमध्ये त्यांच्या पाच मोटारसायकल ऑफर करणार आहेत. ज्यात बुलेट 500, क्लासिक 500, हिमालयन, इंट 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 यांचा समावेश करण्यात आला होता. यात आता रॉयल एनफिल्ड हिमालयन जपानमध्ये लॉंच करण्याचा निर्णय कंपनीने घेतलाय.

रॉयल एनफिल्डने जपानमध्ये हिमालयनची नवी बाईक लॉंच केली आहे, जी Euro 5 emission regulations Tripper Navigation pod , स्विच करण्यायोग्य ABS आणि तीन नवीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. रॉयल एनफिल्डने जपानमध्ये टोकियोमध्ये फ्लॅगशिप स्टोअरसह ऑपरेशन सुरू केलंय, ज्याचं उद्घाटन जानेवारी २०२१ मध्ये करण्यात आलं. जपानसह आशिया-पॅसिफिक प्रदेश आणि हिमालयमध्ये सुद्धा रॉयल एनफिल्डने कंपनीच्या विस्ताराला बळकटी मिळवण्यास सुरूवात केलीय. त्यातील जपानमधील लॉंचिंग याकडे एक प्रमुख पाऊल म्हणून पाहिलं जातं. 650 ट्विन्ससह रॉयल एनफिल्डच्या जपानी बाजारपेठेत पुढे जाण्याची अपेक्षा आहे.

आणखी वाचा : Traffic Rule: ट्रॅफिक चलान जारी केल्यानंतरही पैसे भरावे लागणार नाहीत! हा महत्त्वाचा नियम एकदा वाचाच!

आणखी वाचा : Car Service: Free कार सर्व्हिससह मिळणार आणखी बरेच फायदे, जाणून घ्या काय आहे या कंपनीचं स्मार्ट केअर क्लिनिक

नवी कोरी रॉयल एनफिल्ड हिमालयन २०२१ च्या सुरुवातीला भारतात लॉन्च करण्यात आली होती. किरकोळ कॉस्मेटिक आणि फिचर अपडेटसह तीन नव्या रंगांसह उपलब्ध आहे. यात पाइन ग्रीन, मिराज सिल्व्हर आणि ग्रॅनाइट ब्लॅक या रंगाचा समावेश आहे. याशिवाय, हिमालयनमध्ये ट्रिपर नेव्हिगेशन पॉड देखील मिळतो, जो रिअल-टाइम नेव्हिगेशन ऑफर करतं आणि Google मॅप प्लॅटफॉर्मसह तयार केलं जातं. हिमालयनमध्ये काही किरकोळ कॉस्मेटिक बदल केले आहेत. थोडे उंच विंडशील्ड, टॅंक गार्डवर सुधारित डिझाइन, सुधारित सीट कुशनिंग आणि लगेज कॅरिअरवर अतिरिक्त प्लेट असे बदल यात करण्यात आले आहेत.

इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचं झालं तर अपकमिंग स्क्रॅम 411 मध्ये 411cc चं सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड SOHC इंजिन लावण्यात आलं आहे, जे 24.3 bhp ची पॉवर आणि 32 Nm टॉर्क जेनरेट करू शकतो. ही बाइक 5 स्पीड गियर बॉक्ससह उपलब्ध आहे. रॉयल एनफील्डची अपकमिंग स्क्रॅम 411 ही बाईक २ लाख रुपयांच्या किंमतीने सुरुवातीला लॉंच करण्यात येईल.