Royal Enfield Hunter 350 Finance Plan: रॉयल एनफिल्ड ही बाईक सेगमेंटमध्ये क्रूझर बाईक्सची सर्वात मोठी श्रेणी असलेली कंपनी आहे आणि या रेंजमध्ये ३५० ते ६५० सीसी इंजिनपर्यंतच्या बाईक्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या सध्याच्या रेंजमध्ये आम्ही Royal Enfield Hunter 350 बद्दल बोलत आहोत जी आकर्षक डिझाइन असलेली क्रूझर बाईक आहे. जर तुम्हाला Royal Enfield Hunter 350 आवडत असेल, तर या बाईकचे इंजिन ते मायलेज, रोख पेमेंट आणि ही बाईक खरेदी करण्यासाठी सुलभ फायनान्स प्लॅनचे तपशील येजाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Royal Enfield Hunter 350 किंमत

रॉयल एनफील्ड हंटर रेट्रोच्या बेस मॉडेलबद्दल आम्ही बोलत आहोत, ज्याची सुरुवातीची किंमत १,४९,९०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि ही किंमत ऑन-रोड झाल्यानंतर १,७३,३६१ रुपयांपर्यंत जाते.

या किंमतीनुसार, जर तुम्हाला ही बाईक कॅश पेमेंटमध्ये खरेदी करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला १.७३ लाख रुपये खर्च करावे लागतील. पण तितके बजेट नसण्याच्या स्थितीत, येथे नमूद केलेल्या फायनान्स प्लॅनद्वारे तुम्हाला फक्त ३०,००० रुपयांचे डाऊन पेमेंट भरून ही बाईक खरेदी करता येईल.

(हे ही वाचा : १ लाखाच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करा Mahindra ची शानदार SUV, फीचर्सच्या बाबतीत अव्वल )

Royal Enfield Hunter 350 फायनान्स प्लॅन

जर तुमचे बजेट ३०,००० रुपये असेल, तर ऑनलाइन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, बँक या बजेटसह या बाईकसाठी १,४३,३६१ रुपयांचे कर्ज देऊ शकते. या कर्जाच्या रकमेवर बँक वार्षिक ९.७ टक्के व्याज आकारेल.

Royal Enfield Hunter 350 डाउन पेमेंट आणि मासिक EMI

कर्ज जारी केल्यानंतर, तुम्हाला ३०,००० रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागेल आणि त्यानंतर बँकेने ठरविल्यानुसार ३ वर्षांच्या कालावधीसाठी दरमहा ४,६०६ रुपये मासिक EMI भरावे लागेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Royal enfield hunter 350 can be purchased with a down payment of rs 30 thousand this is a simple finance plan pdb