Royal Enfield कंपनीने भारतामध्ये मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात Hunter 350 ही मोटारसायकल लॉन्च केली होती. या मोटारसायकलला ग्राहकांनी पसंती दर्शवली. त्यामुळे Hunter 350 ची तुफान विक्री होत असल्याचे पाहायला मिळते. मिळणाऱ्या प्रतिसादामुळे कंपनीने या मोटारसायकलची किंमत ३,००० रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Royal Enfield कंपनीमधील प्रॉडक्ट रेंजमधील Hunter 350 ही सर्वात कमी वजनांच्या मोटारसायकलपैकी एक आहे. मागणी वाढल्याने किंमत वाढवण्यात आली आहे असे लोक म्हणत आहेत. या लोकप्रिय मोटारसायकलच्या नव्या आणि जुन्या किंमतीविषयीची माहिती आम्ही देणार आहोत.
Royal Enfield Hunter 350 ही रेट्रो आणि मेट्रो या दोन ट्रिम लेव्हलमध्ये उपलब्ध आहे. याचे Retro Hunter Factory Series, Metro Hunter Dapper Series आणि Metro Hunter Rebel Series असे तीन मुख्य प्रकार आहेत. या मोटारसायकलच्या मॉडेल्सची किंमत १.४९ लाख ते १,७५ लाख रुपये इतकी आहे. Hunter 350 मुळे TVS Ronin, Jawa 43, Honda CB350RS या मोटारसायकलसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
Royal Enfield Hunter 350: इंजिन आणि गियरबॉक्स
Hunter 350 मध्ये 349cc, सिंगल-सिलेंडर, एअर-ऑइल कूल्ड, इंधन-इंजेक्टेड मोटर आहे. ही मोटर 6,100 RPM वर 20.2 bhp आणि 4,000 RPM वर 27 Nm पीक टॉर्क देते. 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी मोटारसायकलचे इंजिन जोडलेले आहे. कंपनीने ही मोटारसायकल 36.2 kmpl मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे.
भविष्यामध्ये भारतात लॉन्च होणाऱ्या Royal Enfield Bikes:
Royal Enfield कंपनी येत्या काही महिन्यांमध्ये त्यांच्या बहुप्रतिक्षित मोटारसायकली लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये new-generation Bullet 350 आणि Himalayan 450 यांचा समावेश असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय कंपनी सध्या Himalayan 450, ShotGun 650 आणि GT 650 या मॉडेल्सवर काम करत आहे असे म्हटले जात आहे.