भारतीय क्रूझर बाईक सेगमेंटमध्ये अनेक कंपन्यांनी एकापेक्षा एक आकर्षक बाईक सादर केल्या आहेत. पण या सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्डच्या बाइक्सना खूप पसंती मिळत आहे. कंपनीने आपली बाईक रॉयल एनफील्ड हंटर 350 काही काळापूर्वी बाजारात आणली आहे आणि ती बाजारात येताच खळबळ उडाली आहे. कंपनीने या क्रूझर बाईकचा लूक अतिशय आकर्षक ठेवला आहे. या बाईकला बाजारात मोठी मागणी आहे.
कंपनीच्या या बाइकमध्ये पॉवरफुल इंजिन वापरण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला अधिक मायलेजसह अनेक अॅडव्हान्स फीचर्स मिळतात. कंपनीने रॉयल एनफील्ड हंटर 350 ही बाईक सध्याच्या क्रूझर बाईकपेक्षा खूपच कमी किमतीत बाजारात आणली आहे. तुम्हीही ही बाईक घेण्याच्या तयारीत असाल तर आम्ही तुम्हाला या बाईकचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमतीबद्दल माहिती देणार आहोत.
(हे ही वाचा : Independence Day च्या निमित्ताने काही तासातच धडाधड विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर आणखी मिळेल स्वस्त! )
Royal Enfield Hunter 350 इंजिन आणि पॉवरट्रेन
कंपनीने आपली क्रूझर बाईक Royal Enfield Hunter 350 अतिशय पॉवरफुल बनवली आहे आणि त्यासाठी त्यात एअर-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित ३४९ cc सिंगल सिलेंडर इंजिन बसवण्यात आले आहे. जे २० bhp च्या कमाल पॉवरसह २७ Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कंपनीने त्याचे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्ससह जोडले आहे.
Royal Enfield Hunter 350 किंमत
या क्रूझर बाईकच्या पुढील भागात, कंपनीने टेलिस्कोपिक फ्रंट फोकसर्स, ड्युअल रिअर शॉक, हॅलोजन हेडलाइट्स, ट्यूबलेस टायर्स, दोन्ही टोकांना डिस्क ब्रेकसह ड्युअल-चॅनल एबीएस, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट, यूएसबी चार्जर आणि १७ फीचर्स दिले आहेत. कंपनीने या बाईकची देशातील बाजारपेठेत किंमत १.४९ लाख ते १.७४ लाख रुपयांदरम्यान निश्चित केली आहे.