Royal Enfield Interceptor Bear 650 : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रॉयल एनफिल्डने अखेर आपली नवीन मोटरसायकल Bear 650चे अनावरण केले आहे. पहिल्यांदाच या बाईकचे फोटो समोर आले आहेत, जे लवकरच इटलीच्या मिलान शहरात आयोजित EICMA मोटर शोमध्ये जगासमोर सादर केले जाणार आहेत. माहितीनुसार, कंपनी ५ नोव्हेंबरला होणाऱ्या मोटर शोमध्ये या नवीन बाईकच्या किमतीदेखील घोषित करू शकते. चला तर मग पाहूया कशी आहे रॉयल एनफिल्डची नवीन बेअर 650 मोटरसायकल.

Royal Enfield Interceptor Bear 650 : लूक आणि डिझाईन

650 सीसी सेगमेंटमध्ये, कंपनीच्या इतर मोटरसायकल इंटरसेप्टर, कॉन्टिनेंटल आणि सुपर मेटिअर प्रमाणेच, ट्विन प्लॅटफॉर्मवर आधारित या सेगमेंटमधील ही पाचवी बाइक आहे. मुळात हे इंटरसेप्टरचे स्क्रॅम्बलर मॉडेल आहे, त्यात अनेक नवीन फीचर्स आणि प्रीमियम मॅकेनिक कम्पोनेन्ट्स समाविष्ट केले आहेत. नावासोबतच Royal Enfield Bear 650चा लूक आणि त्याची डिझाईनही खूपच प्रभावी दिसते.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Maruti Suzuki Dzire 2024
Maruti Suzuki Dzire 2024 : दिवाळीनंतर नवी डिझायर येतेय ग्राहकांच्या भेटीला! जाणून घ्या हटके डिझाइन अन् भन्नाट फीचर्स
Royal Enfield Goan Classic 350
Royal Enfield Goan Classic 350 नोव्हेंबरमध्ये लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स अन् डिझाइन
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?

२१४ एलईडी इंडिकेटर, साइड पॅनेलवर रेसिंग बाइक्ससारखे नंबर बोर्ड आणि 184 मिमीचा उत्कृष्ट ग्राउंड क्लिअरन्स आहे. ही बाईक इंटरसेप्टरपेक्षा जवळपास दोन किलो हलकी आहे. उत्तम ग्राउंड क्लिअरन्ससह, बाईकची ऑफरोडिंग क्षमतादेखील वाढते.

हेही वाचा… बजाज पल्सरला टक्कर द्यायला आली ‘TVS’ची ही बाईक, जास्त मायलेजसह मिळतील खास फिचर्स

ड्युअल पॉड इन्स्ट्रुमेंट कन्सोलऐवजी, गुरिल्ला आणि हिमालयनमध्ये दिला गेलेला गोल आकाराचा टीएफटी डिस्प्ले या बाईकमध्ये देण्यात आला आहे. हा डिस्प्ले गूगल मॅप्सला सपोर्ट करतो आणि नवीन स्विचगियरद्वारे नियंत्रित केला जातो. Royal Enfield Bear 650 पाच वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असेल.

Royal Enfield Bear 650 : पॉवर आणि परफॉर्मन्स

इतर मॉडेल्सप्रमाणेच Bear 650 मध्ये 648 cc पॅरलल ट्विन इंजिन वापरण्यात आलं आहे, परंतु त्यातही मोठा बदल दिसून आला आहे. ड्युअल एक्झॉस्ट पाईप्सऐवजी, बाईक आता टू-इन-वन सिस्टीमवर चालते आणि त्याच्या उजव्या बाजूला सिंगल एक्झॉस्ट आहे. हे इंजिन 47hp पॉवर आणि 56.5Nm टॉर्क जनरेट करते. एक्झॉस्ट सिस्टीममध्ये केलेल्या बदलांमुळे बाईकच्या टॉर्कमध्ये मोठा बदल होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हॉर्डवेअर

नवीन रॉयल एनफिल्ड बेअर 650 इंटरसेप्टर 650 प्रमाणेच चेसिस वापरते, परंतु सस्पेंशन आणि व्हीलचा आकार वेगळा आहे. पुढील आणि मागील चाकाचा सेटअप १८-इंच/१८-इंचाऐवजी १९-इंच/१७-इंच असा बदलण्यात आला आहे, जो स्क्रॅम्बलर मोटरसायकलनुसार अधिक आहे. तसंच याचं सस्पेन्शनदेखील अपग्रेड केले गेले आहे.

हेही वाचा… Skoda Kylaq vs Maruti Brezza: मारुतीला टक्कर द्यायला लवकरच येणार स्कोडाची ‘ही’ एसयूव्ही, इंजिन स्पेसिफिकेशनमध्ये कोण ठरेल वरचढ? घ्या जाणून…

कंपनीने या बाईकच्या सस्पेंशन ट्रॅव्हलमध्येही वाढ केली आहे. इंटरसेप्टरमध्ये दिलेल्या 110 mm/88 mm वरून 130 mm/115 mm पर्यंत याच्यात वाढ केली आहे. याचा परिणाम असा झाला की, सीटची उंचीदेखील 830 मिमीपर्यंत वाढली आहे. यामध्ये कंपनीने एमआरएफचा नवा नायलोरेक्स ब्लॉक पॅटर्न टायर वापरला आहे.

ब्रेकिंग आणि एर्गोनॉमिक्स

इंटरसेप्टरप्रमाणे याच्या समोर ३२० मिमी डिस्क युनिट आहे, परंतु मागील बाजूस 270 मिमी डिस्क ब्रेक उपलब्ध आहे. ही बाईक ड्युअल-चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) ने सुसज्ज आहे. बाईकच्या अर्गोनॉमिक्समध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये एक नवीन हँडलबार आणि फूट पेगची वेगळी पोझिशन मिळते.

Story img Loader