रॉयल एनफिल्डच्या बाइक यो सर्वात जास्त लोकप्रिय बाइक आहेत. अनेकांना बाइक रायडींगची आवड असते . त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी ते रॉयल एनफिल्डच्या बाइक वापरण्यास उत्सुक असतात. सध्या रॉयल एनफिल्ड लवकरच आपली Himalayan 450 बाइक लॉन्च करणार आहे. बाइक प्रेमी या बाइकची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही बाइक कंपनीच्या गेल्या काही वर्षांमधील सर्वात महत्वाच्या लॉन्चिंगपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या हिमालयन 411 ने स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. मात्र त्या बाइकमध्ये काही त्रुटी देखील आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बाइक तयार करणारी चेन्नईमधील कंपनी आपल्या आगामी हिमालयन बाइकमध्ये सर्व त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. नवीन जनरेशनमधील हिमालयन बाइक ही सध्या भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या सध्याच्या हिमालयन बाइकपेक्षा अधिक शक्तिशाली असेल. ही नवीन बाइक गेल्या एक वर्षभरात टेस्टिंगदरम्यान अनेक वेळा पाहण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

हेही वाचा : ह्युंदाईच्या नाइट एडिशनमधील ‘हे’ तिसरे मॉडेल लॉन्च, ऑटोमॅटिक IRVM सह मिळणार…

आता या बाइकचे लेटेस्ट व्हर्जन लॉन्च करण्याबद्दल पुष्टी करण्यात आली आहे. कंपनीने आगामी हिमालयन ४५० चा नवीन टिझर शेअर केला आहे. हिमालयातील बर्फाळ शिखरांमधेय या नवीन बाइकची टेस्टिंग करण्यात येत आहे.

१ नोहेंबरला लॉन्च होणार Himalayan 450

नवीन हिमालयन ४५० १ नोव्हेंबर रोजी भारतात लॉन्च होणार आहे. . नवीन जनरेशन बुलेट 350 बाजारात लॉन्च झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी नवीन हिमालयन लॉन्च होणार आहे. नवीन हिमालयन 450 प्रत्यक्षात कशी दिसते हे अधिकृतपणे दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. अपकमिंग हिमालयन ४५० मध्ये सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड टेक्नॉलॉजीवर आधारित असते ४५० सीसीचे इंजिन मिळू शकते. हे इंजिन ४० बीएचपी पॉवर जनरेट करण्यास सक्षम असेल अशी अपेक्षा आहे. हे इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले जाऊ शकते.

कंपनी ही बाइक २.५० लाख (एक्सशोरूम) च्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्याची शक्यता आहे. रॉयल एनफिल्ड हिमालयन ४५० ही बाइक अपडेटेड KTM अॅडव्हेंचर 390 रेंजला टक्कर देईल.