रॉयल एन्फिल्ड ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. रॉयल एन्फिल्डने आपल्या ग्राहकांसाठी Meteor 350 चे नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहे. लांब प्रवास करणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना रायडींगची आवड असते ते शक्यतो रॉयल एन्फिल्डच्या बाइक्सचा वापर करतात. लॉन्च करण्यात आलेल्या या नवीन व्हेरिएंटमध्ये अनेक फीचर्स कंपनीने दिले आहेत. कंपनीने Meteor 350 चे Aurora हे नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहे. या नवीन व्हेरिएंटमुळे भारतीय बाजारात रॉयल एन्फिल्ड Meteor 350 आता फायरबॉल, स्टेलर, अ‍ॅरोरा आणि सुपरनोव्हा या चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे.

रॉयल एन्फिल्डच्या अधिकृत वेबसाइटवरून नवीन अ‍ॅरोरा व्हेरिएंट निळ्या, हिरव्या आणि काळ्या रंगात उपलब्ध असेल. याशिवाय फायरबॉल चार, स्टेलर तीन आणि सुपरनोव्हा व्हेरिएंट हे उपलब्ध आहेत. व्हेरिएंटनुसार प्रत्येक मॉडेलच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. खरेदीदार Meteor 350 व्हेरिएंट काळ्या, निळ्या, लाल आणि मॅट ग्रीन या रंगामध्ये खरेदी करू शकतात. मॅट ग्रीन हा रंग केवळ फायरबॉल व्हेरिएंटसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
elon musk internet on mars
एलॉन मस्क मंगळावर पोहोचवणार इंटरनेट सेवा? कारण काय? त्याचा फायदा कोणाला?
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Anand Mahindra React on Dosa Printing Machine
फक्त मशिनमध्ये टाकायचं पीठ, मग कुरकुरीत गरमागरम डोसा छापून तयार; पाहा आनंद महिंद्रांनी शेअर केलेला VIRAL VIDEO
Jaipur railway track incident thar stuck in drunken misadventure shocking video goes viral
VIDEO: रील बनवण्यासाठी दारुड्यानं थेट रेल्वे ट्रॅकवर नेली थार; तितक्यात पाठीमागून मालगाडी आली अन्…थरारक शेवट

हेही वाचा : Tata Motors: ‘या’ तारखेला लॉन्च होणार टाटाची नवीन हॅरिअर आणि सफारी फेसलिफ्ट; फीचर्स एकदा बघाच

अ‍ॅरोरा या Meteor ३५० च्या नवीन व्हेरिएंटमध्ये स्पोक व्हील, ट्यूब टायर, क्रोम फिनिश पार्टस, डिलक्स सीट, नेव्हिगेशन, एलईडी हेडलॅम्प आणि अ‍ॅल्युमिनिअम स्विच क्यूब यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. रॉयल एन्फिल्डने उर्वरित तींन व्हेरिएंटमध्ये काही नवीन फीचर्स जोडले आहेत. Meteor ३५० चे टॉप मॉडेल असलेल्या सुपरनोव्हामध्ये आता प्रीमियम एलिमेंट्स आणि फीचर्ससह एलईडी हेडलॅम्प, अ‍ॅल्युमिनिअम स्विच क्यूब असे फीचर्स मिळणार आहेत. टसर स्टेलर या व्हेरिएंटमध्ये ट्रीपर नेव्हिगेशन डिव्हाइस देण्यात आले आहे.

रॉयल एन्फिल्ड Meteor 350: व्हेरिएंटनुसार किंमत

व्हेरिएंटनुसार किंमत पाहायची झाल्यास Meteor 350 ची चेन्नईमधील किंमत २.०६ लाख रुपयांपासून सुरु होते. तर यातील टॉप व्हेरिएंटची किंमत २.३० लाख रुपये आहे. नवीन व्हेरिएंट Aurora ची किंमत २.२० लाख रुपये आहे. Aurora व्हेरिएंट भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या जावा ४२ बाबर, रॉयल एन्फिल्ड क्लासिक ३५० सारख्या गाडयांशी स्पर्धा करेल.