Royal Enfield launches new range of gear for women riders : महिला तुम्हाला रॉयल एनफिल्ड चालवायला आवडते का? मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रॉयल एनफिल्डने महिला-रायडर्ससाठी खास पोशाख आणि रायडिंग गियरची नवीन श्रेणी लॉन्च केली आहे. कंपनी प्रीमियम गियर आणि पोशाख देत आहे जे प्रत्येकवेळी बाईक चालवताना आराम आणि संरक्षण यांचे देते.
महिला रायडर्ससाठी रायडिंग गियरची नवीन श्रेणी: New range of riding gear for female riders: What does it offer?)
१)स्ट्रीटविंड इको रायडिंग जॅकेट (Streetwind Eco Riding Jacket) – ७५ पीईटी बाटल्यांचा पुन्हा वापर करून आणि १००% पुनर्वापर केलेल्या साहित्यापासून बनवलेले शाश्वत राइडिंग जॅकेट ज्याची किंमत आहे रु. ६५०० /-
२) टूर वुमेन्स रायडिंग जॅकेट(Tourer Women’s Riding Jacket) – CE लेव्हल २सह सुरक्षित असलेले जॅकेट काखेत(आर्मर), खांदे (शोल्डर), कोपर(एल्बो) आणि पाठीला(Back) संरक्षण देते. हे जॅकेट स्ट्रेचेबल आहे आणि श्वास घेण्यायोग्य पॉलिस्टर जाळीपासू तयार केलेले आहे. मल्टिपल पॉकेट्स, रिफ्लेक्टिव्ह एलिमेंट्स आणि सीई क्लास ए प्रमाणपत्र अशा वैशिष्ट्यांनी समृद्ध असे जॅकेटची किंमत आहे रु. ९,९५०/-
३) राइड मोअर लेगिंग्स (Ride More Leggings)- हाय अब्रेशन पॉली लाइक्रा लेगिंग्समध्ये CE लेव्हल २ नी प्रोटेक्टर्स(गुडघ्यांना संरक्षण) देते, CE लेव्हल १ हिप प्रोटेक्टर्स, एक प्री-वक्र फिट, री-ब्रँडिंग, दोन बॅक पॉकेट्स आणि CE क्लास ए प्रमाणपत्र आहे. – रु. ५, ५००/-
३) राइड मोअर बुट – रबरी सोलसह टिकाऊ, घर्षण-प्रतिरोधक (abrasion-resistant) लेदरपासून बनवलेल्या बुटांमध्ये पॅड केलेले इंटीरियर, टो शिफ्ट पॅच, काढता येण्याजोगा धुता येण्याजोगा इनसोल आहेत – रु. ६,००,००/-
४) हस्टल वुमेन्स ग्लोव्हज(Hustle Women’s Gloves) – १००% पॉलिस्टर एअर मेशपासून मायक्रोस्यूड आणि पॉली स्ट्रेचसह बनवलेल्या या ग्लोव्हजमध्ये TPR क्नकल(TPR knuckle ) प्रोटेक्शन आणि ४mm रबर स्पंज पाम (rubber sponge palm) यांचा समावेश असू त्याची किंमत आहे रु. ९९०/-
५) स्ट्रिक एस वुमन्स ग्लव्हज (Street ace Women’s Gloves) – हस्टल ग्लोव्हज प्रमाणेच, हे फुल-फिंगर हातमोजे हवेशीर(ventilation), सुरक्षितता आणि एक स्टाइलिश डिझाइनसह मिळतात ज्याची किंमत रु. १,२९०/-
६) हाफ आणि फुल फेस हेल्मेट (Half and Full Face Helmets) हे हेल्मेट सुरक्षितता आणि आराम देते. टिकाऊ असून स्लीक डिझाइनसह उपब्ध आहे ज्याची किंमत आहे – रु. २२००/-
हेही वाचा – टाटाचा नाद करायचा नाय! नव्या अवतारात लॉन्च झाली ही सीएनजी कार, पॉवरफुल इंजिन अन् मायलेजसह किंमतही कमी
रॉयल एनफील्ड महिला विअर रेंज (Enfield Women’s Wear Range)
रॉयल एनफिल्डचे चीफ कमर्शिअल ऑफिसर यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, “आमच्या महिला वेअर कलेक्शन लाँच करून, महिलांच्या नवीन पिढीला मोटरसायकल चालवण्याची आणि साहसाची आवड आत्मविश्वासाने आत्मसात करण्यासाठी प्रेरित करणे हा आमचा उद्देश आहे. एक सहाय्यक आणि प्रेरणादायी समुदाय जिथे महिला कनेक्ट करू शकतात, त्यांचे स्वातंत्र्य व्यक्त करू शकतात, त्यांची आवड निवडू शकतात आणि महिला रायडर्सना राईडमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करू शकतात. ऑफरवरील कलेक्शन हे फक्त राइडिंग गियरपेक्षा अधिक आहे. हे स्वातंत्र्य, स्व-अभिव्यक्ती आणि सर्वसमावेशकतेचे लक्षण आहे.”
हेही वाचा – इलेक्ट्रिक बाईक जास्त चार्ज करता? वेळीच व्हा सावध, नाहीतर निर्माण होईल मोठी समस्या
या कलेक्शनमध्ये बॉम्बर जॅकेट, डेनिम जॅकेट, राइडिंग डेनिम्स, लेदर जॅकेट, टी-शर्ट, वेस्ट, स्वेटशर्ट, रिफ्लेक्टिव्ह पफर जॅकेट आणि वेस्ट आणि थाय बॅगचा समावेश आहे.
रॉयल एनफिल्डचा दावा आहे की,”हे कलेक्शन आराम आणि टिकाऊपणासाठी प्रीमियम फॅब्रिक्सपासून तयार केले आहे, जे हवेशीर असून १००% कॉटन, हलके नायलॉन, लवचिक स्ट्रेचबल पॉलिस्टर आणि रग्ड (खडबडीत) अपीलसाठी उच्च दर्जाचे लेदर आहे. ज्याची किंमत रु.९०० पासून सुरू होते.