Royal Enfield Launched Scram 440 in India: रॉयल एनफिल्ड बाईक्सचा भारतात एक मोठा चाहता वर्ग आहे. विशेषत: तरुणाईमध्ये या क्लासिक बाईकची मोठी क्रेझ पाहायला मिळते, मजबूत आणि दमदार लूकसाठी ही बाईक प्रसिद्ध आहे. अशात तुम्हीही नवीन रॉयल एनफिल्ड बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण कंपनीने तरुणांसाठी एक जबरदस्त बाईक लाँच केली आहे. Scream 440 असे या बाईकचे नाव असून ज्याची किंमत फक्त २.८ लाख आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवीन रॉयल एनफील्ड स्क्रॅम 440 ची किंमत (Royal Enfield Scram 440 Price List)

Royal Enfield Scram 440 ही बाईक दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. यापैकी एक ट्रेल व्हेरियंट आहे, ज्याची किंमत २.०८ लाख रुपये आहे. दुसरा फोर्स व्हेरियंट आहे, ज्याची किंमत सुमारे २.१५ लाख रुपये आहे. दोन्ही बाईकच्या किमतीत फार मोठा फरक नसला तरी फोर्स व्हेरियंटमध्ये तुम्हाला आणखी काही प्रीमियम फीचर्स आणि उत्तम लूकचा पर्याय देण्यात आला आहे.

नवीन रॉयल एनफील्ड स्क्रॅम 440 इंजिन आणि पॉवरट्रेन

Royal Enfield ने त्याच्या Scram 440 मध्ये 443cc एअर/ऑइल-कूल्ड इंजिन दिले आहे. या इंजिनमध्ये 25.4bhp पॉवर आणि 34Nm पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. त्याचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात तुम्ही ही बाईक आरामात घेऊ शकता असा दावा कंपनीने केला आहे.

Royal Enfield Scram 440 डिझाईन, फिचर्स

या बाईकची डिझाईन रॉयल एनफिल्डच्या Scram 411 सारखी आहे. यात एक राउंड हेडलाइट देण्यात आले आहेत, ज्यामध्ये एक लहान काउल आहे. याशिवाय मोठा फ्यू टँक आणि स्लिम टेल सेक्शनमुळे या बाईकला एक क्लासी लूक मिळाला आहे.

Royal Enfield Scram 440 रंगाचे पर्याय

Royal Enfield Scram 440 पाच वेगवेगळ्या रंगांमध्ये लॉंच करण्यात आला आहे. यामध्ये फोर्स टील, फोर्स ग्रे, फोर्स ब्लू, ट्रेल ग्रीन आणि ट्रेल ब्लू (Force Teal, Force Grey, Force Blue, Trail Green, Trail Blue) असे पर्याय उपलब्ध आहेत.

नवीन रॉयल एनफील्ड स्क्रॅम 440 ब्रेकिंग सिस्टम

Royal Enfield Scram 440 मध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मोनोशॉक सस्पेंशन आहे, ज्यामुळे लांबच्या प्रवासात आणि खराब रस्त्यांवरही राइडिंगचा आरामदायी आणि उत्तम अनुभव घेता येतो. या बाईकच्या ब्रेकिंगसाठी दोन्ही टायरमध्ये सिंगल डिस्क ब्रेकचे फीचर्स देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Royal enfield launches scram 440 at rs 2 08 lakh price features variants colour options and read others detailed sjr