दुचाकींमध्ये क्रूझर बाइक सेगमेंटला तरुणांची सर्वाधिक पसंती आहे. या सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्ड, बजाज, होंडा, सुझुकी आणि जावा यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांच्या बाइक्स आहेत. आज आम्ही रॉयल एनफिल्ड Meteor 350 बद्दल सांगणार आहोत. कंपनीने अलीकडेच प्रीमियम फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह गाडी लॉन्च केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या बाईकची सुरुवातीची किंमत १.९८ लाख रुपये असून टॉप व्हेरियंटमध्ये २.१४ लाख रुपयांपर्यंत जाते. जर तुम्ही किंमत पाहून खरेदी करू शकत नसाल, तर सुलभ डाउन पेमेंट आणि ईएमआय येथे जाणून घ्या. . योजनेचे संपूर्ण तपशील. BIKEDEKHO या वेबसाइटवर दिलेल्या डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार दिले आहेत., Royal Enfield Meteor 350 चे फायरबॉल व्हेरिएंट खरेदी केल्यास बँक कंपनीशी संबंधित या बाईकसाठी १,९६,२२२ रुपयांचं कर्ज देणार आहे. यासाठी तुम्हाला २१,८०२ रुपये किमान डाउन पेमेंट करावे लागेल, त्यानंतर दरमहा ६,४२५ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. Royal Enfield Meteor 350 वर कर्जाचा कालावधी बँकेने ३६ महिन्यांसाठी ठेवला आहे. बँक या कर्जाच्या रकमेवर ९.७ टक्के वार्षिक दराने व्याज आकारेल.

देशात इलेक्ट्रिक वाहनांची सर्वाधिक मागणी उत्तर प्रदेशात; महाराष्ट्राबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले…

तुम्हाला ही बाईक विकत घ्यायचा विचारात असाल तर, गाडीचे फिचर्सबद्दल जाणून Royal Enfield Meteor कंपनीने तीन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. यात ३४९ सीसी सिंगल सिलेंडर इंजिनमध्ये दिलं असून इंधन इंजेक्टेड एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन २०.४ पीएसची कमाल पॉवर आणि २७ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने त्याच्या पुढच्या आणि मागील चाकांमध्ये डिस्क ब्रेक दिले आहेत. तसेच ड्युअल चॅनल एबीएस सिस्टम बसवण्यात आली आहे. बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ,ही Meteor 350 ४१.८८ किमीचा मायलेज देत असून ARAI द्वारे प्रमाणित आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Royal enfield meteor 350 cruiser bike with just rs 21000 with emi plan rmt