रॉयल एनफिल्डने आपली रेट्रो बाईक Meteor 350 दोन नवीन रंगात लाँच केली आहे. आता तुम्ही फायरबॉल ब्लू आणि फायरबॉल मॅटग्रीन रंगांमध्ये बाइक खरेदी करू शकता. यासोबतच सुपरनोव्हा व्हेरिएंट सुपरनोव्हा रेड कलरमध्ये खरेदी करता येईल. Royal Enfield Meteor 350 बाइकच्या फायरबॉल व्हेरियंटची किंमत २.०५ लाख रुपये आहे, स्टिलर व्हेरिएंटची किंमत २.११ लाख रुपये आहे. सुपरनोव्हा व्हेरियंटची किंमत २.२२ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
रॉयल एनफिल्ड Meteor 350 मध्ये ३४९ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे ६१०० आरपीएमवर २० बीएचपीची पीक पॉवर आणि ४००० आरपीएमवर २७ एनएम टॉर्क जनरेट करते. पुढील भागात ४१ एमएम फोर्क्स टेलिस्कोपिक सस्पेंशन आहे. तसेच ट्विन ट्यूब इमल्शन शॉक ऍब्जॉर्बरसह ६-स्टेप अॅडजस्टेबल प्रीलोड सस्पेंशन त्याच्या मागील बाजूस देण्यात आले आहे. समोर ३०० एमएमचा डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस २७० एमएमचा ब्रेक देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी यामध्ये ड्युअल चॅनल एबीएस फीचर देण्यात आले आहे.
प्रिंटेड सोलार पॅनेलच्या मदतीने टेस्लाची कार धावणार १५,००० किमी! ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ प्रयत्नशील
रॉयल एनफिल्ड Meteor 350 या मोटरसायकलमध्ये अनेक उत्तम वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. यात एलईडी डीआरएल, पीनट शेप आकाराची इंधन टाकी, आकर्षक रीअर फेंडर्स, मोठा विंडस्क्रीन, एलईडी टेललॅम्प आणि यूएसबी चार्जरसह रेट्रो-स्टाईल गोलाकार हेडलॅम्प्स मिळतात. टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसाठी हे रॉयल एनफिल्डच्या ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टमसह येते. टॉप-स्पेक सुपरनोव्हाला विंडस्क्रीन आणि पॅसेंजर बॅकरेस्ट मिळते.