Royal Enfield Recall: रॉयल एनफिल्ड तिच्या परफॉर्मन्स बाईक्ससाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आता कंपनीच्या हिमालयन या पॉवरफुल बाइकमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला आहे, त्यानंतर रॉयल एनफिल्डने या बाईकचे काही युनिट परत मागवले आहेत. २७ फेब्रुवारी २०२३ रोजी, रॉयल एनफिल्डने यूएस नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशन (NHTSA) ला कळवले की, १ मार्च २०१७ ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान निर्मित हिमालयन बाईक्स ब्रेकिंगच्या समस्यांच्या अधीन असू शकतात. त्यामुळे, कंपनी या समस्येमुळे बाधित सुमारे ४,८९१ युनिट्सचे निराकरण करण्यासाठी परत बोलावत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे प्रकरण भारताचे नसून अमेरिकन मार्केटचे आहे. म्हणूनच तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. ग्लोबल मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही समस्या कंपनीने बाइकमध्ये वापरलेल्या कॅलिपरशी संबंधित आहे. हिवाळ्याच्या महिन्यांत रस्ते स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मोठ्या प्रमाणात मिठाच्या संपर्कात आल्यास ते आणखी वाईट होऊ शकते. त्यामुळे, कंपनीने बाधित मोटारसायकलच्या पुढील आणि मागील ब्रेक कॅलिपर बदलण्यासाठी ऐच्छिक रिकॉलची घोषणा केली आहे.

(हे ही वाचा: Normal Cars की Hybrid Cars कोणती कार खरेदी करणे फायदेशीर ठरणार? जाणून घ्या सर्वकाही एका क्लीकवर)

कंपनीला सुरुवातीला ब्रिटनच्या बाजारपेठेत अशा प्रतिक्रिया मिळाल्या होत्या, परंतु सध्या हे रिकॉल यूएस मार्केटसाठी करण्यात आले आहे. हे शक्य आहे की येत्या काही दिवसांत, कंपनी यूके, युरोप, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या इतर काही जागतिक बाजारपेठांमध्ये रिकॉलची घोषणा करू शकते. मात्र, याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

समस्या काय आहे?

या समस्येमुळे ब्रेक लावताना असामान्य आवाज येऊ शकतो असे कंपनीचे म्हणणे आहे. यामुळे कॅलिपरजवळ जळणारा वास देखील येऊ शकतो. वापरकर्त्यांना रॉयल एनफिल्ड हिमालयन मॅन्युअली ढकलणे देखील कठीण होऊ शकते. लक्षात घ्या की, Brembo नावाची कंपनी रॉयल एनफिल्डला ब्रेक कॅलिपर पुरवते आणि बॉश कंपनीचे ABS साठी ब्रेकिंग घटक पुरवते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Royal enfield recalls nearly 5000 units of himalayan due to brake issues in us pdb