Royal Enfield Scram 440: रॉयल एनफील्ड कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सतत चर्चेत येत असते.रॉयल एनफील्डचा एक मोठा चाहतावर्ग दिसून येतो. लूक आणि फीचर्समुळे अनेक जण आवडीने ही दुचाकी खरेदी करतात. रॉयल एनफिल्ड अनेकदा तिचे अपडेटेड व्हर्जन बाजारात आणते. आता रॉयल एनफील्डने Motoverse 2024 मध्ये नवीन Scram 440 चे अनावरण केले आहे. कंपनी सध्या भारतात Scrum 411 विकत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ही मोटरसायकल सध्याच्या मॉडलपेक्षा अधिक पॉवरफूल असल्याचे सांगितले जात आहे. या बाईकचा लुकही जबरदस्त आहे, तसेच ही बाईक नवीन टेक्नॉलॉजीसह लाँच होईल असेही सांगितले जात आहे. दरम्यान या बाईक किंमत जानेवारी २०२५ मध्ये जाहीर करण्यात येईल. यानंतर या बाईकची डिलिव्हरी सुरु होईल.

Royal Enfield ने भारतात नवीन Scram 440 चे अनावरण केले आहे, जे जुन्या हिमालयावर आधारित Scram 411 ची जागा घेईल. स्क्रॅम 411 च्या तुलनेत स्क्रॅम 440 मध्ये नवीन काय आहे चला जाणून घेऊयात.

Royal Enfield Goan Classic 350 4 colours one classic ride
Royal Enfield Goan Classic 350: चार आकर्षक रंगामध्ये लॉन्च होणार रॉयल एनफिल्ड गोअन क्लासिक ३५०, क्लासिक राइडचा घ्या आनंद
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
What Raj Thackeray Said About Sharad Pawar
Raj Thackeray : “आमच्याकडे शरद पवार नावाचे संत जन्माला आले त्यांनी जातीपातींमध्ये..”, राज ठाकरेंची बोचरी टीका
maharashtra assembly election 2024 eknath shinde cheated me says palghar mla srinivas vanga
एकनाथ शिंदेंनी मला फसवलं; उमेदवारी डावललेल्या आमदार श्रीनिवास वनगा यांचे वक्तव्य
Rajesh Tope manoj jarange
Rajesh Tope : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या शरद पवारांच्या शिलेदाराचा पराभव
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : भाऊबीजेला अजित पवारांची वाट बघणार का? सुप्रिया सुळेंचं उत्तर, “प्रेम असतं तेव्हा…”

नवीन रॉयल एनफील्ड स्क्रॅम 440 चा लुक काहीसा Scram 411 सारखाच असू शकतो. काही किरकोळ बदल आहेत पण लक्षणीय बदल आहेत. Scram 440 चे वजन देखील Scram 411 च्या तुलनेत वाढले आहे .नवीन रॉयल एनफील्ड Scram 440 कोणतेही नवीन फीचर्स नसतील. यासोबतच सेमी-डिजिटल ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी हेडलाइट आणि टेललाइट, बल्ब इंडिकेटर देण्यात आले आहेत. हे सर्व फीचर आधीच्या बाईकमधील आहे. कंपनीने आता या बाईकसोबत यूएसबी टाइप ए चार्जर दिला आहे. याशिवाय रॉयल एनफिल्ड स्क्रॅम 440 मध्ये ट्रिप्ड पॉड नेव्हिगेशन आणि इतर फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनी ही नवीन मोटरसायकल 2 व्हेरिएंटमध्ये लाँच करणार आहे असे कंपनीने सांगितले आहे.

मिळणार अधिक पॉवरफूल इंजिन

यामध्ये 443 cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे अधिक पॉवरफूल असेल. हे सिलेंडर 3 मिमी मोठे आणि 81 मिमी रुंद आहे. हे इंजिन सध्या बाईकमधील असेलल्या इंजिनपेक्षा 4.5 टक्के जास्त पॉवर आणि 8.5 टक्के जास्त टॉर्क जनरेट करेल असा दावा कंपनीने केला आहे.

हेही वाचा >> Activa Electric: इलेक्ट्रिक स्कूटर घेत आहात? होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; जाणून घ्या काय असेल किंमत

किंमत किती?

Royal Enfield Scram 440 ची किंमत अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु या बाईकची एक्स-शोरूम किंमत सुमारे २.३० लाख रुपये असण्याची शक्यता आहे.