Royal Enfield Super Meteor 650 : रॉयल इन्फिल्डच्या बाइक्स देशात प्रचंड लोकप्रिय आहेत. वजनदार आणि शक्तीशाली बाईक्स अशी त्यांची ओळख आहे. खडतर रस्त्यांवरून ही बाईक सहज पुढे जाते, तसेच उंच ठिकाणी देखील या बाईक तुम्हाला घेऊन जाऊ शकतात. देश भ्रमंती करणारे बाईक रायडर्स रॉयल इन्फिल्डच्या बाईक्सना प्रचंड पसंती देतात. या वर्षी रायल इन्फिल्डने आपल्या कुटुंबात हंटर बाईकचा समावेश केला होता. त्यानंतर आता काही दिवसांतच ही कंपनी सुपर मेटिओर ६५० ही बाईक लाँच करणार आहे. कंपनीने तिचा टिजर प्रदर्शित केला आहे.

ही बाईक EICMA 2022 motor show मधून पदार्पण करणार आहे. ८ नोव्हेंबरला इटलीमध्ये हा शो होणार आहे. कंपनीने याबाबतचा टिजर सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये सुपर मेटिओरची मागील भागाची झलक दिसून आली आहे. कंपनीने अद्याप या बाईकच्या नावाची पुष्टी केलेली नाही, मात्र सुपर मेटिओर ६५० असे तिचे नाव राहण्याची शक्यता आहे. जागतिक पदार्पणानंतर २०२३ च्या सुरुवातीपासून ही बाईक भारतीय बाजारात उपलब्ध होऊ शकते.

kawasaki bikes discount offer in february 2025 Know This Details Kawasaki Bikes features
Kawasaki बाईक घेण्याची सुवर्णसंधी; कावासाकीच्या या बाईक्सवर मिळत आहे हजारो रुपयांची सूट, जाणून घ्या ऑफर डिटेल्स
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Google trends : KTM 390 Adventure S
KTM 390 Adventure S की Royal Enfield Himalayan 450 , कोणती बाइक आहे बेस्ट? डिझाइन, फीचर्स, इंजिन अन् किंमत, जाणून घ्या एका क्लिकवर
nuclear energy production information in marathi
कुतूहल : अणुऊर्जा – एक अपरिहार्य पर्याय
asteroid 2024 YR4 may hit Earth
फुटबॉल मैदानाएवढा अशनी २०३२ मध्ये पृथ्वीला धडकणार? नासाचा इशारा
Alpha beta gamma differences
कुतूहल : किरणोत्सारी खनिजे
an innovative container style aquarium Dubai Alibaug bhumi pujan
अलिबाग मध्ये दुबईच्या धर्तीवर मत्स्यालयाची उभारणी होणार, इनोव्हेटिव्ह कंटेनर पद्धतीच्या मत्स्यालयाची भारतात पहिल्यांदाच उभारणी
News About Honda
Honda : होंडा भारतात सुरु करणार इलेक्ट्रिक बाइकची फॅक्टरी, काय असणार खासियत?

(यामाहा YZF-R15 V4 बाईकच्या किंमतीत चौथ्यांदा वाढ, जाणून घ्या फीचर्स आणि नवी किंमत)

असे आहे डिझाईन

रॉयल इन्फिल्ड सुपर मेटिओर ६५० मध्ये टिअरड्रॉप आकाराचे फ्युअल टँक, गोलाकार एलईडी हेडलॅम्प आणि टेल लॅम्प, रुंद हँडलबार, स्प्लिट टाइप सीट, ड्युअल एक्झॉस्टसह पुढच्या दिशेने पाय राहातील अशी बसण्याची व्यवस्था असेल. बाईकमध्ये सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि मल्टी स्पोक अलॉय व्हिल्स असतील.

इतक्या सीसीचे असेल इंजिन

बाईकमध्ये ६४८ सीसी पॅरेलल ट्विन इंजिन असेल. हे इंजिन ४७.५ बीएचपीची शक्ती आणि ५२ एनएमचा टॉर्क निर्माण करण्याची शक्यता आहे. बाईकला स्लिपर क्लचसह सिक्स स्पिड गेअरबॉक्स मिळेल.

(हिवाळ्यात कार सुरू केल्यानंतर लगेच चालवू नका, इंजिनवर होईल वाईट परिणाम, ‘या’ टीप्स फॉलो करा)

किंमत

सुरक्षेसाठी बाईकमध्ये ड्युअल चॅनल एबीएससह मागे आणि पुढे डिस्क ब्रेक असेल. मागे ट्विन शॉक अब्झॉर्बर आणि पुढे फ्रंट इनव्हर्टेड फोर्क असतील. या बाईकची किंमत ३.५ लाखांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.

Story img Loader