तरुणांध्ये बाईक्सबाबत नेहमीच प्रचंड क्रेझ राहिली आहे. बाईकचे अनेकजण शौकीन आहेत. भारतीय दुचाकी मार्केटमध्ये Royal Enfield च्या बाईक्स खूप पसंत केल्या जातात. या बाईकचे जगभरातच चाहते आहेत. Royal Enfield च्या बाईक्स अनेक वर्षापासून ग्राहकांच्या मनावर राज्य करीत आहे. आता बाईकप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच देशात एक नवी Royal Enfield ची बाईक दाखल होणार आहे.
बाईकचा टीझर रिलीज
रॉयल एनफिल्ड ही कंपनी दरवर्षी एकापेक्षा जास्त दमदार बाईक्स लाँच करत असते. आता रॉयल एनफिल्ड कंपनी लवकरच ‘Royal Enfield Himalayan 452’ बाईक लाँच करणार असल्याची माहिती आहे. कंपनीने बाईक सादर करण्यापूर्वीच या बाईकचा टीझर रिलीज केला आहे. या टीझरमध्ये कंपनीने बाईक पूर्णपणे उघड केली आहे, ज्यातून बाईकची माहिती समोर आली आहे. या बाईकचा टीझर फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
टीझरमध्ये पांढऱ्या रंगाची बाईक दाखवण्यात आली आहे. बाईकच्या इंधन टाकीमध्ये ग्राफिक्स देण्यात आले आहेत. बाईकच्या इंधन टाकीला सुरक्षित ठेवण्यासाठी साइड फ्रेम्सही देण्यात आल्या आहेत. कंपनीने या बाईकमध्ये एक छोटा सायलेन्सर दिला असून त्यावर सिल्व्हर सायलेन्सर गार्ड बसवण्यात आला आहे. बाईकचा टेल सेक्शन बर्यापैकी स्लिम आहे आणि त्याच्या मागे एलईडी टेललाइट मिळणे अपेक्षित आहे.
(हे ही वाचा: मोठ्या कुटुंबांसाठी परफेक्ट असलेली ‘ही’ स्वस्त सात सीटर कार खरेदीसाठी लागल्या रांगा, २६ kmpl मायलेज, किंमत फक्त… )
कधी होणार लाँच?
हे मॉडेल १ नोव्हेंबर २०२३ रोजी बाजारात सादर होण्याची शक्यता आहे. Royal Enfield Himalayan 452 मध्ये ४-व्हॉल्व्ह हेड आणि DOHC कॉन्फिगरेशनसह ४५१.६५cc लिक्विड-कूल्ड इंजिनद्वारे समर्थित केले जाऊ शकते. असा अंदाज आहे की हे इंजिन ८,०००rpm वर ३९.५७bhp चा आउटपुट आणि ४०-४५Nm पर्यंत टॉर्क देऊ शकते. याशिवाय यात ६-स्पीड गिअरबॉक्स असण्याची अपेक्षा आहे. या बाईकची लांबी २,२४५ मिमी, रुंदी ८५२ मिमी आणि उंची १,३१६ मिमी असू शकते. त्याचा व्हीलबेस १,५१० मिमी असू शकतो. तर एकूण वजन ३९४ किलो असू शकते.
या नवीन बाईकच्या ब्रेकिंग सिस्टममध्ये पुढील आणि मागील दोन्ही डिस्क ब्रेक असतील. यासोबतच ड्युअल चॅनल एबीएस देखील असेल. या बाईकला USD फ्रंट फोर्क्स, मोनोशॉक रिअर सस्पेंशन, राइड-बाय-वायर तंत्रज्ञान आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज केले जाऊ शकते.
किंमत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, असा अंदाज आहे की, आगामी Royal Enfield Himalayan 452 ची किंमत २.५० लाख ते २.७० लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते. ही बाईक लाँच झाल्यावर बाजारात 452 BMW G 310GS, KTM 390 Adventure आणि Yezdi Adventure सारख्या बाइक्सशी स्पर्धा करेल.