थोड्या उशिरा का होईना महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. तसेच मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापले आहे. कोकण, मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. उन्हाळ्यामुळे त्रस्त असलेल्या लोकांना पावसाने दिलासा दिला आहे. मात्र अनेक शहरांमध्ये पूर येतो. सखल भागामध्ये पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनेक शहरांमध्ये मान्सूनचे आगमन होताच, रस्त्यावर पाणी साचणे आणि त्यामुळे वाहतुकीच्या प्रश्नांमुळे नगरिकांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. मुसळधार पावसामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून अनेक तास त्यांना ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागते. आज आपण पावसाळ्यामध्ये वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी याबाबद्दलच्या काही टिप्स जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त hindustantimes ने दिले आहे.

हेही वाचा : 2023 Kia Seltos की Hyundai Creta: इंजिन, परफॉर्मन्स आणि सुरक्षेच्या बाबतीत कुठली कार वरचढ?

कार सुरू करण्यापूर्वी दोनदा तपासावी

पावसाळ्यामध्ये कार चालवण्याआधी कारमधील सर्व गोष्टी योग्य काम करत आहेत ना याची खात्री करून घ्यावी. हेडलॅम्प, टेललाईट्स., टर्न इंडिकेटर, विंडशिल्ड वायपर आणि ब्रेक्स टॉप ऑर्डरमध्ये काम करत असल्याची खात्री करावी. तसेच टायरमधील हवेचे प्रमाण देखील तपासावे.

कारचे हेडलाईट्स सुरू ठेवा

पावसाळ्यामध्ये गाडी चालवताना दृश्यमानता कमी असण्याची शक्यता असते. त्यासाठी गाडी चालवताना हेडलॅम्प आणि फॉग लॅम्प सुरू ठेवल्यास समोरील रास्ता नीट दिसण्यास मदत होते. तसेच इतर ड्रायव्हर्सना देखील यामुळे मदत होते. त्यामुळे पावसात वाहन चालवताना हेडलाइट्स आणि फॉग लॅम्प लावूनच गाडी चालवणे फायद्याचे ठरते.

कार सावकाश चालवावी

मुसळधार पावसामध्ये कार नेहमी सावकाश चालवावी. यामुळे गाडी स्लिप होणे किंवा अपघात टाळण्यास मदत होते. वेग हा मोहक असू शकतो मात्र पावसाळ्यामध्ये वेगाने ड्राइव्ह करणे हे धोक्याचे ठरू शकते. या काळामध्ये शक्यतो ओव्हरटेक करणे टाळावे. कारवार नियंत्रण ठेवण्यासाठी स्टिअरिंग व्हील्सवर तुमचे दोन्ही हात घट्ट ठेवावेत. समोरील वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यास अपघात होऊ नये म्हणून समोरील कारमध्ये आणि तुमच्या कारमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.

लेनची शिस्त पाळावी

पावसामध्ये गाडी चालवत असताना तुम्ही तुमची लेन अचानक बदलू नये. एखादे वळण असल्यास किंवा लेन बदलण्यापूर्वी इंडिकेटर वापरावे. यामुळे तुमच्या मागील वाहनाला तुम्ही लॅन्ड बदलत आहात किंवा एखाद्या ठिकाणी वळत आहात हे लक्षात येईल.

विंडशील्ड आणि विंडो नेहमी स्वच्छ ठेवा

पावसाळ्यामध्ये गाडी चालवताना दृष्यमानता कमी असण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगल्या दृश्यमानतेसाठी तुमच्या कारच्या विंडशिल्ड आणि विंडो स्वच्छ ठेवणे फायदेशीर ठरू शकते. बाजारामध्ये अशी काही प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत ज्याचा वापर केल्याने पावसाच्या पाण्याला विंडशील्ड पासून दूर ठेवतात. मात्र त्याचा वापर योग्य सल्ला घेऊनचं करावा.

हेही वाचा : जबरदस्त सेफ्टी आणि फीचर्स असलेल्या Tata च्या ‘या’ कारने पार केला ५ लाखांच्या विक्रीचा टप्पा, किंमत फक्त…

पाणी साचलेला भाग टाळावा

तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे त्या मार्गावर पाणी साचलेले असल्यास पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. कारण पाणी साचलेल्या भागातून कार नेल्यास त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणे चांगले ठरू शकते.